शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टर आढळल्यास सरपंच, ग्रामसेवकाला जबाबदार धरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 20:25 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे ग्रामीण भागात खळबळ

ठळक मुद्देरुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर होणार कारवाई

वाळूज महानगर :  ग्रामीण भागात रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आता गावात बोगस डॉक्टर आढळून आल्यास संबंधित गावातील सरपंच व ग्रामसेवकाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

वैद्यकीय शिक्षण नसताना अनेकांनी ग्रामीण भागात अवैधपणे दवाखाने सुरू केले आहेत. ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी घेतात. या बोगस डॉक्टरांचे बड्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांशी लागेबांधे असल्यामुळे हे त्यांच्याकडे आलेले रुग्ण या खाजगी रुग्णालयात रेफर करतात. त्यामुळे बड्या रुग्णालयातील डॉक्टरांकडून या बोगस डॉक्टरांना काही रक्कम दिली जात असल्याचे काही डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करण्याचे आदेश शासनाने आरोग्य विभागाला दिले आहेत. ग्रामीण भागात अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना गावातील लोक पाठीशी घालत असून, त्यांच्यावर कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारीनंतर जिल्हधिकारी चौधरी यांनी ग्रामीण भागात अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील वैद्यकीय शिक्षण अर्हतेबाबत खात्री केल्याशिवाय त्यांना व्यावसायिकांची परवानगी ग्रामपंचायतीने देऊन नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शैक्षणिक अर्हता असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यास अडचण निर्माण झाल्यास तालुका वैद्यकीय अधिकारी व नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेण्याच्या सूचना सरपंच व ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक आढळल्यास त्याची माहिती गटविकास अधिकारी, तालुकास्तरीय अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक शोध समिती, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांना देण्यात आले आहेत.

गंगापूर तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींना पत्र देणारग्रामीण भागात अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरी, धामोरी, लासूर व गाजगाव आदी ठिकाणच्या ५ बोगस डॉक्टरांवर यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे. आता तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींना आरोग्य विभागाच्या वतीने मंगळवारी (दि.४) पत्र देऊन गावातील अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांची माहिती मागविण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश घोडके यांनी दिली.

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद