शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोडमध्ये भाजपने विरोध केला तर शिवसैनिक महाराष्ट्रभर उत्तर देतील;अब्दुल सत्तारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 20:07 IST

सिल्लोडमध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोध करत आहेत

सिल्लोड: सिल्लोड विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना स्थानिक भाजप पदाधिकारी विरोध करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपकडून  बंडखोरी होण्याचे चिन्ह दिसत आहेत. यामुळे सिल्लोडमध्ये भाजपाने विरोध केला तर शिवसैनिक महाराष्ट्रात भाजपाला जशास तसे उत्तर देतील, असा इशारा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपाला दिला.

भराडी येथे मिर्ची प्रक्रिया केंद्राचे भूमिपूजन केल्यानंतर सत्तार यांनी पत्राकरांसोबत संवाद साधला. सिल्लोडमध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी तुम्हाला विरोध करत आहेत, यावर सत्तार यांनी प्रतिक्रिया देत भाजपाला इशारा दिला. ते म्हणाले, सिल्लोडमध्ये भाजपवाले जसे काम करतील त्याच पद्धतीने आमचे शिवसैनिक मराठवाडा व महाराष्ट्रात काम करतील. त्यांना जशासतसे उत्तर मिळेल असा, इशारा देत सत्तार यांनी खळबळ उडवून दिली आहे.

विरोधकांपेक्षा भाजपाचा अधिक विरोधसिल्लोड विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा या महाविकास आघाडीपेक्षा स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा अधिक विरोध दिसत आहे. अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध आगामी निवडणुकीत भाजपचा एक बंडखोर अपक्ष उभा राहू शकतो किंवा भाजपचा एखाद्या स्थानिक नेता महाविकास आघाडीत जाऊन लढू शकतो अशी चर्चा आहे. त्यात भरीस भर म्हणून लोकसभा मतदार संघात पराभूत झालेले रावसाहेब दानवे व अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दिक हल्ले वाढले आहेत. माजी खासदार दानवे स्थानिक नेत्यांना बळ देऊन लोकसभेच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. दानवे समर्थकांनी सत्तार यांच्या विरुद्ध अजिंठा येथे रस्तारोको आंदोलन केले. यावेळी सिल्लोड पाकिस्तान होत आहे की काय असे दानवे बोलले होते. त्यानंतर सत्तार समर्थकांनी निषेध मोर्चा काढत भाजपला धक्का दिल. यामुळे कुरघोडी अधिक वाढत जाऊन भाजपाच्या नेतृत्वात सिल्लोड येथे आक्रोश मोर्चा काढला. आरोप प्रत्यारोप होत असल्याने सिल्लोड विधानसभा मतदार संघात भाजप सेनायुती मध्ये बिघाडीचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारBJPभाजपाShiv Senaशिवसेना