शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

सूप व दुरड्यांपासून साकारलीय ‘श्रीं’ची मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:12 IST

शहरातील बुरुड गल्लीतील ‘श्री’ बालगणेश मंडळ बुरुड समाज दरवर्षी गणरायाच्या विविध फळा पासून तसेच वेग- वेगळ्या वस्तूपासून मूर्ती बनविणारे गणेश मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे. तसेच या मंडळांनी बनविलेल्या मूर्ती खरोखरच आकर्षण ठरतात. मागील १९ वर्षापासून या मंडळातर्फे गणरायाची स्थापना केली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील बुरुड गल्लीतील ‘श्री’ बालगणेश मंडळ बुरुड समाज दरवर्षी गणरायाच्या विविध फळा पासून तसेच वेग- वेगळ्या वस्तूपासून मूर्ती बनविणारे गणेश मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे. तसेच या मंडळांनी बनविलेल्या मूर्ती खरोखरच आकर्षण ठरतात. मागील १९ वर्षापासून या मंडळातर्फे गणरायाची स्थापना केली जाते.या मंडळातर्फे दरवर्षी नवनवीन कल्पना श्रीच्या मूर्तीच्या रुपात उतरविल्या जातात. मागील वर्षीही आलूपासून बनविलेली गणरायाची मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरली होती. तसेच यंदाही १० सूप आणि २०० दुरड्यांपासून श्रींची साडेपाच फुटांची मूर्ती अवघ्या तीन दिवसांत साकारली आहे. दरवर्षी या मंडळाची कार्यकारिणी गठीत करतानाच यंदा साकारण्यात येणाºया मूर्तीवर प्रथम चर्चा केली जाते. तीन ते चार वस्तूंवर बैठकीत चर्चा होऊन कमी खर्चात आणि कमी वेळात होणाºया मूर्तीला सर्वानुमत्ते परवानगी दिली जाते. सूप व दुरड्यांसाठी तब्बल ७५ बांबू लागले आहेत. सांगली येथून बांबूंची मागणी केली होती.मूर्ती अगदी साध्या पद्धतीने जरी बनविलेली असेल तरीही दुरुनच आकर्षक ठरते. त्यामुळे हे अगदी बारिक नक्षीकाम जवळ जावून पाहण्याचा मोह भक्तांना आवरत नाही. यासाठी अभया गुडमलवार, तुळशीराम उरेवार, बाबूराव जोरगेवार, गणेश उरेवार, अनिल उरेवार, रमेश उरेवार, संजय उरेवार, गजानन उरेवार, शंकर गुडमलवार, राजू गुडमलवार, ईश्वर उरेवार यांच्यासह आदींनी परिश्रम घेऊन कमी वेळात गणरायाची मूर्ती साकारली आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.