शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

देवमूर्ती घडवणारा वाट पाहतोय दैव बदलण्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 20:13 IST

भारतीय समाजरचनेत गावगाड्यातील बारा बलुतेदारांपैकी एक असलेला पाथरवट (वडार) समाज पूर्वीपासूनच दगडांपासून लेणी, शिल्प, देवांच्या मूर्ती, दगडी मंदिरे, तसेच घरगुती वापराच्या पाटा, वरवंटा, खलबत्ते, इत्यादी साहित्य, कलाकृती बनवून जीवन जगत असे.

ठळक मुद्देपारंपरिक साधनांची जागा इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी घेतल्यामुळे या समाजावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली.बहुतांश भटका असलेल्या या समाजाला जीवन जगण्यासाठी मोलमजुरी करावी लागत आहे.

- ज्ञानेश्वर चोपडे

आळंद (औरंगाबाद )  : दगडांवर छन्नी-हातोड्याचा घाव घालत देवमूर्ती निर्माण करणाऱ्या पाथरवट समाजाची सध्या दुर्दशा झाली आहे. पूर्वी बारा बलुतेदारांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेला हा समाज दगडांपासून घडविलेले साहित्य विकून उदरनिर्वाह चालवायचा. मात्र, आताच्या काळात घरगुती वापरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने या समाजाला रोजीरोटीसाठी दाही दिशा भटकावे लागत आहे. करोडो लोक ज्यांच्यासमोर रोज नतमस्तक होतात, अशा देवाच्या मूर्तींना घडविणारा हा समाज सध्या अस्तित्वासाठी धडपडतोय.

भारतीय समाजरचनेत गावगाड्यातील बारा बलुतेदारांपैकी एक असलेला पाथरवट (वडार) समाज पूर्वीपासूनच दगडांपासून लेणी, शिल्प, देवांच्या मूर्ती, दगडी मंदिरे, तसेच घरगुती वापराच्या पाटा, वरवंटा, खलबत्ते, इत्यादी साहित्य, कलाकृती बनवून जीवन जगत असे. विशेष म्हणजे त्यांच्याशिवाय गाव अधुरे राहत होते. मात्र कालौघात पारंपरिक साधनांची जागा इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी घेतल्यामुळे या समाजावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे बहुतांश भटका असलेल्या या समाजाला जीवन जगण्यासाठी मोलमजुरी करावी लागत आहे.

शासनाकडून मदतीची अपेक्षापाथरवट समाजाचा पारंपरिक धंदा बंद पडण्याच्या मार्गावर असून बहुतांश उत्कृष्ट कारागीर बेरोजगार झाले आहेत. छन्नी-हातोड्यांनी दगडांवर घाव घालून रट्टलेले हात पोटापाण्यासाठी मोलमजुरी करून जीवन जगत आहेत. जे लोक पारंपरिक व्यवसायाला चिकटून बसले आहेत, त्यांची परिस्थिती बिकट आहे. शासनाने या कलाकारांच्या कलेची कदर करून त्यांना मदत करावी. अन्यथा ही कला कालौघात नष्ट होईल. या कारागिरांना शासकीय अनुदान व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळाल्यास त्यांच्या कलेला वाव मिळून समाजाची प्रगती होईल.

पाटा, वरवंट्याला मिळत नाहीत ग्राहकसध्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे जग असून वेगवान व कोणत्याही कष्टाविना गृहिणी मिक्सरवर घरातील मसाले वाटून घेतात. पाटा, वरवंट्यावरील चव ही कितीही चांगली असली, तरी कष्ट घेण्याची तयारी नवीन पिढीमध्ये नसल्याने पाथरवटांच्या पाटा, वरवंट्याला मागणी घटली आहे. एव्हाना ती नसल्यातच जमा आहे. यामुळे या समाजावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

कष्टाचे कामपाथरवट समाज मोठमोठ्या दगडांवर घाव घालून आपल्या कलेचा वापर करून मूर्ती, पाटा, वरंवटा घडवितात. मात्र आता खाणीतून दगड आणणेही महाग झाले आहे. तसेच दगडांवर  कित्येक तास हातोड्याचे घाव घालून या वस्तू घडविण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते. त्यामानाने या वस्तूंना मागणी तर नाहीच. मात्र जे ग्राहक मिळतात तेही अत्यंत कमी किमतीत या वस्तू मागतात. यामुळे पाथरवट समाज अडचणीत सापडला आहे.

आमच्या कलेची शासन दरबारी नोंद नसल्याने ही कला लुप्त होत चालली आहे. शासनाने आमच्या कारागिरांची नोंद घेऊन आम्हाला शासकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.  - शेषराव धोत्रे, कारागीर. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक