शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आॅरिकमध्ये विमाननिर्मिती उद्योग सुरू करण्याचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:25 IST

पुढच्या काही वर्षांत १ हजार नवीन विमाने विकत घ्यावी लागणार आहेत. त्यासाठी कार्गाे पॉलिसी तयार केली जात आहे. पुढच्या काही वर्षांत १० लाख कोटींचे विमान खरेदी करावी लागतील. त्या सर्व विमानांचे भारतात उत्पादन व्हावे. यासाठी नियम बनविले जात आहेत. आॅरिक सिटीतील शेंद्रा-बिडकीनमध्ये मुबलक प्रमाणात जागा असल्यामुळे येथे विमाननिर्मिती उद्योग सुरू करण्याची शक्यता केंद्रीय उद्योग तथा नागरी उड्डयनमंत्री प्रभू यांनी शनिवारी वर्तविली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पुढच्या काही वर्षांत १ हजार नवीन विमाने विकत घ्यावी लागणार आहेत. त्यासाठी कार्गाे पॉलिसी तयार केली जात आहे. पुढच्या काही वर्षांत १० लाख कोटींचे विमान खरेदी करावी लागतील. त्या सर्व विमानांचे भारतात उत्पादन व्हावे. यासाठी नियम बनविले जात आहेत. आॅरिक सिटीतील शेंद्रा-बिडकीनमध्ये मुबलक प्रमाणात जागा असल्यामुळे येथे विमाननिर्मिती उद्योग सुरू करण्याची शक्यता केंद्रीय उद्योग तथा नागरी उड्डयनमंत्री प्रभू यांनी शनिवारी वर्तविली.बिडकीनस्थित आॅरिक टप्पा-२ च्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींची उपस्थिती होती. प्रभू म्हणाले, पुढच्या काही वर्षांत औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी (आॅरिक) वसाहतीमधील जागेचा विमाननिर्मिती उद्योगासाठी विचार होऊ शकतो. विमान उद्योग येथे आल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. तसेच १ मिलियन डॉलरची उलाढाल ड्रोन उत्पादन उद्योगांची आहे. त्यामुळे ड्रोनचे उत्पादनदेखील विमान उत्पादनासोबत करण्याचा विचार होईल. साधारणत: दीड लाख लोकांना आॅरिकमध्ये रोजगार मिळेल. विमानाचे, ड्रोन उत्पादन येथे सुरू झाले तर रोजगार निर्मितीचा आकडा खूप मोठा असेल, त्या उद्योगांशी निगडित लघुउद्योगदेखील येथे येतील, असा दावा त्यांनी केला.येणाऱ्या काळात महाराष्ट्र आघाडीवरजगातील अनेक उद्योगांना येथे गुंतवणूक करायची आहे. पायाभूत सुविधांची विचारणा होत आहे. येणाºया काळात महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले असेल.दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसह ९० हजार कोटींचा ग्रेट कॉरिडॉर निर्माण करायचे ठरविले. डिसेंबरपर्यंत तो प्रकल्प पूर्ण होईल. कच्चा माल येण्यासाठी रेल्वे निर्माण केल्या आहेत. पायाभूत सुविधा हळूहळू तयार होत आहेत. डीएमआयसी हा प्रकल्प केंद्र व राज्य सरकारचे संबंध कसे असावे, त्याचा आदर्श आहे.डीएमआयसी, अमृतसर ते कोलकाता, चेन्नई ते बंगळुरू, बंगळुरू ते मुंबई हे प्रकल्प आल्यावर विकासाला चालना मिळेल. पर्यावरणाची काळजी या प्रकल्पात घेतली जाईल. पाण्याच्या पुन:वापराचा यामध्ये विचार केल्याचे त्यांनी नमूद केले.रोजगारनिर्मितीच्या आकड्यात तफावतमुख्यमंत्र्यांनी डीएमआयसीमध्ये ३ लाख रोजगार निर्मितीची क्षमता असल्याचा दावा केला, तर केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी दीड लाख उद्योग निर्मिती होईल, असे सांगितले. दोन्ही मंत्र्यांच्या रोजगार निर्मितीच्या आकड्यांत समोर आलेली तफावत चर्चेचा विषय ठरली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSuresh Prabhuसुरेश प्रभूShendra MIDCशेंद्रा एमआयडीसी