शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

आयसीएफकडून माऊंट फ्रेंडशिप मोहीम फत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:11 AM

इंडियन कॅडेट फोर्स (आयसीएफ) आणि जिल्हा अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते १५ मे यादरम्यान आयोजित १७ हजार ३४६ फूट उंचीवरील माऊंट फ्रेंडशिप शिखर सर करीत मोहीम औरंगाबाद येथील आयसीएफच्या ५ गिर्यारोहकांनी फत्ते केली. विशेष म्हणजे १२ वर्षीय रिया नरवडे हिनेदेखील १६ हजार फूट उंचीपर्यंत यशस्वी चढाई करण्याचा पराक्रम केला.

ठळक मुद्दे१२ वर्षीय रिया नरवडे हिचा पराक्रम : केली १६ हजार फूट उंचीवर यशस्वी चढाई

औरंगाबाद : इंडियन कॅडेट फोर्स (आयसीएफ) आणि जिल्हा अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते १५ मे यादरम्यान आयोजित १७ हजार ३४६ फूट उंचीवरील माऊंट फ्रेंडशिप शिखर सर करीत मोहीम औरंगाबाद येथील आयसीएफच्या ५ गिर्यारोहकांनी फत्ते केली. विशेष म्हणजे १२ वर्षीय रिया नरवडे हिनेदेखील १६ हजार फूट उंचीपर्यंत यशस्वी चढाई करण्याचा पराक्रम केला.हिमालय पर्वत रांगेतील माऊंट फ्रेंडशिप हे शिखर सर करण्यासाठी आयसीएफचे पथक १ मे रोजी औरंगाबाद येथून रवाना झाले होते. माऊंट फ्रेंडशिप मोहिमेत आयसीएफच्या पथकात शिखर कन्या व गत वर्षी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करणारी प्रा. मनीषा वाघमारे, किशोर नावकर, राहुल अहिरे, सूरज सुलाने, शोएब पठाण, डॉ. प्रशांत काळे, विनोद विभूते, कविता जाधव, आरती चिल्लारे, रिया नरवडे, इशिता हिवर्डे, प्रेरणा पंडागळे, श्रद्धा कोळी, अर्थ अग्रवाल सहभागी झालेहोते. यापैकी किशोर नावकर, सूरज सुलाने, प्रशांत काळे, आरती खिल्लारे व प्रेरणा पंडागळे यांनी माऊंट फ्रेंडशिप शिखर सर केले व उर्वरीत जणांनी १६000 ते १६५00 फूट उंचीपर्यंत यशस्वी चढाई केली. हे पथक सुरुवातीला प्रथम मनाली येथे पोहोचले. बुरवा येथे २ दिवस वातावरणाशी एकरूप होण्यासाठी या पथकाने सराव केला. मोहीम फत्ते केल्यानंतर आयसीएफचे हे पथक नुकतेच औरंगाबादला पोहोचले. या मोहिमेला रवाना होण्याआधी या गिर्यारोहकांना आयसीएफचे कमांडर विनोद नरवडे यांनी मार्गदर्शनकेले. मोहीम फत्ते करणाऱ्या आयसीएफच्या गिर्यारोहकांचे प्रभूलाल पटेल, नंदू पटेल, फुलचंद सलामपुरे, दयानंद कांबळे, अमृत बिºहाडे, बाबूराव गंगावणे, सुनील कोळी, डॉ. पंकज अग्रवाल, डॉ. नीलिमा अग्रवाल, सतीश पंडागळे, रत्नदीप देशपांडे, अजय वाहूळ, चेतन सरवदे, विशाल काकडे आदींनी अभिनंदन केले.मोहिमेआधी केला कसून सरावमोहिमेस प्रत्यक्ष चढाई करण्याआधी हे पथक ११ हजार ५०० फुटांवर असलेल्या बखरताज बेस कॅम्पला पोहोचले. वेगाने वाहणारा वारा, बर्फवृष्टी आणि पावसाला सामोरे जात या पथकाने २ दिवस बर्फात चालण्याचा, उतरणाºया व हाईट गेनिंगसाठी कॅम्प १ पर्यंत जाऊन पुन्हा परतण्याचा सराव केला.गाईड बुद्धिप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली ८ मे रोजी पहाटे ४ वाजता बेस कॅम्पवरून चढाईस सुरुवात केली व दुपारी २ वाजून १९ मिनिटांनी माऊंट फ्रेंडशिप शिखरावर तिरंगा आणि आयसीएफचा झेंडा फडकावला.