शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आईची मी काळजी घेईन; पण बाबा कुठेत? समृद्धीवर अपघात, चिमुकलीच्या प्रश्नाने सारे निरुत्तर

By संतोष हिरेमठ | Updated: July 4, 2023 13:45 IST

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; चिमुकलीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवल

छत्रपती संभाजीनगर : परिचारिका, ब्रदर जिथे बसतात, त्या टेबलजवळ ७ वर्षांची चिमुकली बसलेली होती. परिचारिका, ब्रदर तिची आपुलकीने विचारपूस करीत होते, काळजी घेत होते. नातेवाईक पोहोचले, तरी ती त्यांच्याजवळ बसून होती. जखमी अवस्थेतील आईची ‘मी घरी काळजी घेईन’ अशी सांगत होती. आपले ‘बाबा’ कायमचे सोडून गेले, याची तिला कल्पनाच नव्हती. ‘बाबा कुठे आहेत’, असे ती विचारत होती. समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात ती बालंबाल बचावली. तिला साधे खरचटलेही नाही; पण तिच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले.

समृद्धी महामार्गावर सोमवारी पहाटे झालेल्या अपघातात सुशीलकुमार थोरात यांचा मृत्यू झाला, तर पत्नी बबिता थोरात या गंभीर जखमी झाल्या, तर ७ वर्षांची मुलगी अद्विता ही बचावली. १०८ रुग्णवाहिकेतून बबिता यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोबत अद्विता होती. बबिता यांच्या चेहऱ्यावर मार लागला. एक हात फ्रॅक्चर झाला. आईवर उपचार सुरू असताना अद्विता ही अपघात विभागातील ब्रदर, परिचारिकांच्या टेबलजवळ बसून होती. ब्रदर आणि परिचारिकांचा अपघात झाल्याची माहिती घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्रदर, परिचारिकांना मिळाली. नातेवाईक येईपर्यंत काही ब्रदर, परिचारिका मदतीसाठी धावून आल्या. अद्विकाची सारे आस्थेवाईकपणे काळजी घेत होते. शहरातील नातेवाइकांनीही घाटीत धाव घेतली. घाटीतील उपचारानंतर बबिता यांना पुढील उपचारासाठी वाशिम येथे नेल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.

खूप भयानक अपघात...बबिता यांना बोलणेही कठीण जात होते. तशाही अवस्थेत नातेवाइकांशी बोलताना ‘खूप भयानक अपघात’ असे त्या म्हणाल्या. उपचार सुरू असताना सुशीलकुमार यांच्या मृत्यूची त्यांना कल्पना दिलेली नव्हती; पण त्या पतीविषयी वारंवार विचारत होत्या.

गाडी खूप उंचावरून खाली पडलीअद्विका चारचाकीच्या पाठीमागे बसलेली होती. गाडी खूप उंचावरून खाली पडली, असे तिने परिचारिकांशी बोलताना सांगितले. बाबा कुठेत, अशी ती विचारणा करीत होती.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद