शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

आता माझ्या पाठींब्यावर चंद्रकांत खैरे खासदार होणार; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 15:58 IST

मागील लोकसभेत हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे पराभव झाल्याचा चंद्रकांत खैरे यांचा आरोप

औरंगाबाद: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ प्रदर्शित करत, आपण आता लोकसभा नाही तर कन्नड मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत, असे स्पष्ट केले. तसेच खासदार इम्तियाज जलील यांनी आपण पुन्हा एकदा निवडून येणार असल्याचे वक्तव्य केल्याचं उल्लेख करत, यावेळी चंद्रकांत खैरे खासदार होणार कारण मी त्यांच्यासोबत असेल असा दावा केला आहे. विशेष म्हणजे, मागील लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेल्या मतांमुळे आपला पराभव झाल्याची भावना खैरे यांची आहे. यामुळे मागील निवडणुकीतील कट्टर विरोधक आता खरेच एकत्र येणार का ? अशी  चर्चा रंगली आहे. 

मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. एमआयएम- वंचितचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा विजय झाला. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विरोध करत मोठ्या प्रमाणावर मते घेतल्याने आपला पराभव झाल्याचा आरोप माजी खासदार खैरे यांनी केला होता. मात्र, आता जाधव यांनी खैरे यांना माझा पाठिंबा असेल अशी घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरु आहेत. माजी खासदार खैरे हे उद्धव ठाकरे यांच्या गटात आहेत. तर कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत हे देखील ठाकरे गटात आहेत, यामुळे जाधव त्यांच्या पाठिंब्यावर किती काळ ठाम राहतील याबाबत विविध अंदाज वर्तवले जात आहेत.

व्हिडिओतून हर्षवर्धन जाधव म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत माझं लक्षच नव्हतं. घरगुती वादात मी एवढा अडकलो होतो. निवडणुकीला वेळ देऊ शकलो नव्हतो. या गृहकलहात मी इतका अडकलो की रायभन जाधव साहेबांनी दिलेली जबाबदारीच मी विसरून गेलो. माझ्या एका मित्राचा महावितरणाच्या चुकीमुळे जीव गेला आणि त्याचे मुलं उघड्यावर आली. त्यामुळे मी गृहकलह-गृहकलह करत बसल्यास आशा घटना घडत राहतील. म्हणून आता आगामी विधानसभा निवडणुकीत मी पुन्हा मैदानात उतरणार आहेत. तर इम्तियाज जलील म्हणतात, ते पुन्हा खासदार होतील. मात्र यावेळी चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा औरंगाबादचे खासदार होणार असल्याचा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. आपण विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे देखील जाधव म्हणाले.

टॅग्स :Harshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभा