शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 05:44 IST

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या नामकरणाविरोधात आलेल्या याचिका कोर्टाने फेटाळल्यामुळे महाविकास आघाडीसह नामकरणाच्या विरोधात असणाऱ्यांना मोठी चपराक बसल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. 

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : मी दोन दिवसांपासून येथे आहे. मी ठाण मांडून बसलो म्हणजे करेक्ट कार्यक्रम करूनच जातो, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विराेधकांना दिला. ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते. 

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या नामकरणाविरोधात आलेल्या याचिका कोर्टाने फेटाळल्यामुळे महाविकास आघाडीसह नामकरणाच्या विरोधात असणाऱ्यांना मोठी चपराक बसल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. 

कोर्टाच्या निर्णयाचा निवडणूक निकालावर परिणाम होईल काय, यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की निवडणुकांशी संबंध जोडणारे हे महाविकास आघाडीचे आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात छळ करणाऱ्या औरंगजेबाचे नाव या जिल्ह्याला राहावे, यासाठी ज्यांनी भूूमिका घेतली, त्यांना संभाजीनगरकर धूळ चारतील. 

‘मी सर्वकाही जाहीरपणे करतो’ तुम्ही काँग्रेससोबत जाणार, असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले, यावर शिंदे म्हणाले, त्यांनी जावईशोध लावला आहे. मी सर्वकाही जाहीरपणे करतो. लपून-छपून काहीही करीत नाही.

‘त्यांनी सवंगड्यांनाच बनविले घरगडी’ नाशिक : ‘राजा का बेटा राजा नही होता, जो काम करेगा वो राजा बनेगा’ आमच्याकडे कोणी मालक नाही. उद्धवसेनेत सवंगड्यांना घरगडी बनविले जाते, असा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. 

नामकरणाचा निर्णय ठाकरेंचाच : अंधारेछत्रपती संभाजीनगर : या शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर व्हावे, याचा पहिला निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला. त्यानंतर निव्वळ श्रेयवादासाठी भाजप आणि महायुतीकडून ठरवून त्यांचीच माणसे आक्षेप व्यक्त करणाऱ्या याचिका घेऊन न्यायालयात गेले. या सगळ्या याचिका न्यायालयाने खारीज केल्या आणि नामकरणाचा मार्ग मोकळा झाला, असे उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे