शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

‘पुरे हिंदुस्थान में औरंगाबाद शहर को सलाम करता हूँ...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 14:44 IST

स्मरण : शायरांनी पेश केलेल्या प्रत्येक शेरला कुठे प्रतिसाद द्यावा, कशी दाद द्यावी, कुठे नको, याची औरंगाबादकरांची जाण पाहूण राहत इंदौरी भारावून गेले होते.

ठळक मुद्देप्रख्यात शायर राहत इंदौरी यांचे औरंगाबादवर विशेष प्रेमअनेकदा दिल्या भेटीही; शहरवासियांनीही केला सन्मान

औरंगाबाद : औरंगाबादकरांची उर्दू भाषेची जाण व त्यांचे शायरीवरील उत्कट प्रेम पाहून प्रख्यात शायर राहत इंदौरी यांनी येथील एका मुशायऱ्यात त्यांच्या विशेष अंदाजात ‘पुरे हिंदुस्थान में औरंगाबाद को सलाम करता हूँ...’ असा संवाद साधताच, उपस्थित हजारो रसिकजनांनी त्यांना ‘जनाब, बहोत खुब’ म्हणत टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.  

देशाचे जानेमाने शायर राहत इंदौरी यांच्या निधनाचे वृत्त शहरात धडकले अन्  त्यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली.  त्यांच्या औरंगाबाद भेटीच्या  आठवणी  अनेकांनी जागविल्या. मौलाना आझाद महाविद्यालयातील प्रा. सिद्दीकी झकियोद्दीन ऊर्फ मशू हे सचिव असलेल्या उम्मीद कल्चरल फाऊंडेशनने ६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने २६ जानेवारी २०१८ रोजी अखिल भारतीय स्तरावरील मुशायरा शहरात आयोजित केला होता. लोकमत वृत्तपत्र समूह या मुशायऱ्याचा मीडिया पार्टनर होता.  मौलाना आझाद महाविद्यालयालगतच्या नवल टाटा स्टेडियममध्ये हा मुशायरा पार पडला होता.  प्रा. मशू म्हणाले, देशभरातून १५ नामचीन शायर या मुशायऱ्यात सहभागी झाले होते; परंतु राहत इंदौरी यांना मिळालेला प्रतिसाद उत्स्फूर्त होता. 

शायरांनी पेश केलेल्या प्रत्येक शेरला कुठे प्रतिसाद द्यावा, कशी दाद द्यावी, कुठे नको, याची औरंगाबादकरांची जाण पाहूण राहत इंदौरी भारावून गेले होते. तेव्हा त्यांनी शायरीच्या दिवाण्या औरंगाबादकरांना उद्देशून ‘पुरे हिंदुस्थान में औरंगाबाद को सलाम करता हूँ...’ असे उद्गार काढले होते. या मुशायऱ्यात शिरकत केलेल्या मान्यवरांचे स्वागत लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, फाऊंडेशनचे अध्यक्ष मंजूर खान यांनी केले होते. यासह अनेक आठवणी प्रा. मशू यांनी सांगितल्या. सात महिन्यांपूर्वीच ११ जानेवारीला राहत इंदौरी औरंगाबादेत आले होते. कौमी एकतेवरील एक सुरेख संदेश यावेळी मुशायऱ्यातून त्यांनी दिला होता. त्यांना मंचावर शायरीसाठी निमंत्रित करताच औरंगाबादकरांनी उभे राहून टाळ्यांचा मोठा गजर केला होता. तेव्हा या सन्मानाला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘बीमार हूँ. बेकार नहीं. आधी सदी से एक तिहाई दुनिया में मैं शायरी सुना रहा हूँ, लेकीन ऐसी कामयाबी नहीं देखी. त्यानंतर आपल्या विशेष अंदाजात त्यांनी, ‘अपना आवारा सर झुकाने को तेरी दहलिज देख लेता हूँ,और फिर कुछ दिखाई दे न देकाम की चीज देख लेता हूँ...’   पुढे ते म्हणतात, ‘तेरी परछाई मेरे घर से नहीं जाती है, तू कही हो मेरे अंदर से नहीं जाती है, आसमां मैंने तुझे सर पे उठा रखा है, ये है तोहमत जो मेरे सर से नहीं जाती है,

दु:ख तो ये है कि अभी अपनी सफहें तिरछी है,ये खराबी मेरे लश्कर से नहीं जाती है...’  हा शेर त्यांनी पेश केला होता. याला जोडत ते पुढे सादर करतात...

‘मैं जब मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना, लहूसे मेरी पेशानी पर हिंदुस्थान लिख देना,

उठा शमशीर, दिखा अपना हुनर, क्या लेगा,ये रही जान, ये गर्दन है, ये सर है, क्या लेगा,

सिर्फ एक शेर उड़ा देगा परखच्चे तेरे, तू समझता है कि शायर है ये, कर क्या लेगा...’या आशयगर्भ; परंतु विद्यमान स्थितीवर प्रखर भाष्य करणारी शायरी त्यांनी सादर केली होती. 

2009 मध्येही राहत इंदौरी एका मुशायऱ्यानिमित्त शहरात आले तेव्हा लोकमतला त्यांनी विशेष मुलाखत दिली होती. यासह अन्य एक-दोन वेळा औरंगाबादेत आलेल्या राहत इंदौरी यांचा औरंगाबादकरांवर विशेष लोभ होता. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यू