शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मी शर्यतीत नाही...; पंतप्रधानपदाबाबत शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 06:06 IST

२०२४ मध्ये बदल घडेल, हा विश्वास आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क,  छत्रपती संभाजीनगर : निवडणूकच लढवत नसल्याने पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असण्याचा प्रश्न नाही. आधी एकत्र येणे गरजेचे आहे. नेता कोण व पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, हे नंतर पाहता येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले.   

बुधवारी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, राष्ट्रवादी कट्टर भाजप विरोधी आहे. पाटणा येथील विरोधी पक्षांच्या एकजुटीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. कालच यासंदर्भात नितीशकुमार यांचा मला फोन आला होता, असे सांगत पवार यांनी नमूद केले की, नितीशकुमार यांच्यावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे. ते आमच्याबरोबर आहेत.  नितीन गडकरी हे चांगले मंत्री असून ते मंत्रिपदाला न्याय देतात. ते पक्षीय दृष्टिकोन ठेवत नाहीत, असे सांगत पवार यांनी गडकरींचे कौतुक केले.

दलितांना संरक्षण देण्याची गरज 

दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासींनाही  संरक्षण देण्याची गरज आहे. सरकारचे ते काम आहे, असे नांदेड येथील अक्षय भालेराव खूनप्रकरणी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी स्पष्ट केले.  

बीआरएसकडे दुर्लक्ष करता येणार नाही  

बीआरएसच्या अनुषंगाने पवार म्हणाले, जे लोक बीआरएसमध्ये जाताहेत ते पाहता फार चिंता करण्याची गरज नाही; पण बीआरएसकडे डोळेझाकही करू शकत नाही.  ब्रिजभूषण सत्ताधारी खासदार त्यांची चौकशी होतेय ही समाधानाची बाब, असे एका प्रश्नाच्या उत्तरात पवार यांनी सांगितले.  

ट्रेंड भाजपविरोधी 

देशातला ट्रेंड भाजपविरोधी आहे. उत्तर प्रदेश, आसाम, गुजरातमध्ये भाजप आहे. देशातल्या अन्य राज्यांमध्ये भाजप नाही. २०२४ मध्ये बदल घडेल, हा विश्वास आहे, असेही पवार यांनी ठासून सांगितले. महाराष्ट्रात विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका एकत्रित होतील, असे वाटत नाही, असे सांगून पवार यांनी निवडून येण्याची क्षमता पाहून जागावाटपाची चर्चा सुरू होईल, असे नमूद केले.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस