शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘मी खासदार, घरात दोन नगरसेवक; तरीही माझ्या घरात पाणी नाही’; खासदार खैरे यांची महापौरांवर आगपाखड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 11:57 IST

खासदार खैरे यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह मनपाच्या अधिकाऱ्यांवर संताप करून सर्वांची परेड घेतली.

ठळक मुद्दे खासदार खैरे यांची महापौरांवर आगपाखडअधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती

औरंगाबाद : शिवसेना नेते खा.चंद्रकांत खैरे यांच्या घरी चार दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने त्यांनी गुरुवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह मनपाच्या अधिकाऱ्यांवर संताप करून सर्वांची परेड घेतली. जेव्हा स्वत:च्या घरी अडचण येते, तेव्हा सामान्यांचे काय हाल होत असतील, याची जाणीव आज खा.खैरेंना झाली. 

शहरात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर खा.खैरेंनी मनपाच्या अधिकाऱ्यांना आणि महापौरांना चांगलेच फैलावर घेतले. राजाबाजार येथे संस्थान गणपतीची खैरेंच्या हस्ते आरती होती.  महापौरांचे आगमन होताच खैरे भडकले. मी खासदार आहे, माझ्या घरात दोन नगरसेवक असताना पाच दिवसांपासून घरात पाणी येत नाही. पाणीपुरवठा विभागाला शिस्त लावा.

रस्त्यांवर खड्डे, बंद पथदिव्यांबाबत त्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर महापौरांनी संतोषीमाता मंदिरात तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. पॅचवर्कवर सुमारे तीन कोटी रुपयांचा चुराडा आजवर केलेला आहे. तरीही प्रमुख रस्ते खड्ड्यात आहेत. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याचे आदेश महापौर घोडेले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना दिले होते.  

खड्डेमय रस्त्यानेही संताप

गुरुवारी गणरायाचे स्वागत मात्र खड्डेमय रस्त्यांनी केले. त्यामुळे खैरे यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे महापौरांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश महापौरांनी अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी यांना दिले.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी