शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मी पुन्हा एकदा सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगतोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:07 IST

यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आणि पुन्हा एकदा सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगत असल्याचे ‘सीएमआयए’चे माजी अध्यक्ष गौतम नंदावत म्हणाले.

ठळक मुद्देअवयव दान : युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये गौतम नंदावर यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी

औरंगाबाद : आयुष्यात दुसऱ्यांसाठी रुग्णालयात गेलो; परंतु स्वत:च्या एखाद्या आजारासाठी कधीही रुग्णालयाची पायरी चढलो नव्हतो. इंजेक्शनची भीती वाटत असे. अशा सगळ्यात ६ सें.मी.च्या ट्युमरमुळे यकृताची चलनप्रक्रिया थंडावली. तीन महिन्यांपेक्षा अधिक आयुष्य नसल्याचे सांगितले जात होते; परंतु यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आणि पुन्हा एकदा सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगत असल्याचे ‘सीएमआयए’चे माजी अध्यक्ष गौतम नंदावत म्हणाले.शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये आॅगस्टमध्ये त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उन्मेष टाकळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय रोटे, मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलचे डॉ. विक्रम राऊत यांची उपस्थिती होती. या दोन्ही रुग्णालयातील तज्ज्ञांनी ही शस्त्रक्रिया केली. डॉ. टाकळकर म्हणाले, ब्रेन डेड व्यक्तीचे यकृत अथवा नातेवाईकांचे अर्धे यकृत घेऊन प्रत्यारोपण शक्य असते. दोन्ही रुग्णालयाच्या सहकार्याने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सिग्मा हॉस्पिटलमधील हे दुसरे यकृत प्रत्यारोपण होते. अवयवदानाची ही प्रक्रिया अधिक सक्षम व्हावी. त्यातून अधिक रुग्णांना फायदा होईल.शहरातच शस्त्रक्रियेचा विश्वासकुटुंबातील व्यक्तींचे यकृत वैद्यकीय कारणांमुळे प्रत्यारोपित करता आले नाही. अखेर सिग्मा हॉस्पिटलमध्ये यकृत उपलब्ध झाले आणि शस्त्रक्रियाही झाली. यापूर्वी १९९८ मध्ये नातेवाईकाच्या स्टेंटची शस्त्रक्रिया शहरातच झाली होती. त्यामुळे यकृत प्रत्यारोपणही शहरातच होईल, असा विश्वास होता, असे गौतम नंदावत म्हणाले.पारदर्शकपणे होते प्रत्यारोपणदरवर्षी किमान देशात ३० हजार लोकांना यकृत प्रत्यारोपणाची गरज असते. प्रत्यक्षात १५०० ते २ हजार लोकांनाच यकृत उपलब्ध होते. यकृत, किडनी प्रत्यारोपणाअभावी अनेक जण मृत्युमुखी पडतात. त्यामुळे अवयवदानामुळे एखाद्याचा जीव कसा वाचतो, हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडत असते. त्यावर शासनाचीही देखरेख असते, असे डॉ. विक्रम राऊत म्हणाले. 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल