शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

'मी औरंगाबादकर'; नामांतरविरोधी मोर्चात तरुणाईचा उत्साह, भर पावसात निघाला मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 20:12 IST

‘आम्ही औरंगाबादकर, हमारा औरंगाबाद, तारिखी औरंगाबाद’ अशा अनेक फलकांसह तरुण तिरंगा झेंडा घेऊन उपस्थित होते.

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा ठराव मागील महिन्यात राज्य सरकारने घेतला. या निर्णयाविरोधात शहरात सर्वपक्षीय नामांतरविरोधी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. समितीने मंगळवारी दुपारी भडकलगेट ते आमखास मैदानापर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन केले. मोर्चात तरुणाईची लक्षणीय उपस्थिती होती. ‘मी औरंगाबादचा, औरंगाबाद माझे’ यासह ‘आय लव्ह औरंगाबाद’ अशा अनेक फलकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

दुपारी दोन वाजता सुरू होणारा मोर्चा फारशी गर्दी न जमल्यामुळे तीन वाजता सुरू झाला. टाऊन हॉल उड्डाणपूल ओलांडून मोर्चा थेट आमखास मैदानात दाखल झाला. ‘आम्ही औरंगाबादकर, हमारा औरंगाबाद, तारिखी औरंगाबाद’ अशा अनेक फलकांसह तरुण तिरंगा झेंडा घेऊन उपस्थित होते. दुपारपासूनच रिमझिम पाऊस सुरू होता. त्यानंतरही मोर्चातील गर्दी कमी झाली नाही. उलट वाढत गेली. यावेळी एमआयएमचे माजी शहराध्यक्ष शारेख नक्षबंदी, माजी नगरसेवक महेंद्र सोनवणे, गंगाधर ढगे, नासेर सिद्दीकी, कुणाल खरात, अय्युब जहागीरदार, शुकूर सालार, आदींनी मार्गदर्शन केले. शेख अहेमद यांनी संचालन केले.

खा. जलील यांची शरद पवारांवर टीका...राज्य शासनाने शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादच्या नामांतराचा ठराव मंजूर केला त्यावेळी, हा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेण्यात आल्याच शरद पवार म्हणाले होते. मात्र, त्यांनतर शरद पवार काल औरंगाबादमध्ये असतांना म्हणाले की, आम्हाला माहितच नाही काय ठराव घेतला. आम्हाला याबाबतीत काहीच माहित नसल्याचे म्हणाले. हे म्हणजे झूठ बोले कंव्वा कांटे असे आहे, अशी टीका खा. इम्तियाज जलील यांनी यावेळी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनImtiaz Jalilइम्तियाज जलील