शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
5
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
6
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
7
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
8
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
9
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
10
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
11
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
12
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
13
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
14
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
15
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
16
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
17
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
19
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
20
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...

हुश्श...! अखेर राज्यातील १४२१ एम.फिल. धारक प्राध्यापकांचा प्रश्न निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 11:41 IST

२५ वर्षांपासूनचा प्रलंबित ‘यूजीसी’ने काढला निकाली

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील १२ अकृषी विद्यापीठांतील संलग्नित महाविद्यालयांतील १ हजार ४४७ एम. फिल.धारक प्राध्यापकांचा मागील २५ वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २ जुलै रोजी निकाली काढला. १४४७ पैकी १४२१ प्राध्यापकांच्या पदोन्नतीसह इतर सर्व प्रकारचे लाभ देण्यास मान्यता दिल्याचे पत्र यादीसह ‘यूजीसी’चे उपसचिव डॉ. निखिल कुमार यांनी काढले आहे.

राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये १ जानेवारी १९९४ ते ११ जुलै २००९ या कालावधीत एम. फिल.वर प्राध्यापकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. या प्राध्यापकांना ‘नेट-सेट’मधून सूट देण्याची २५ वर्षांपासून मागणी आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘यूजीसी’चे तत्कालीन अध्यक्ष जगदीशकुमार यांच्यासोबत बैठक घेतली. १४ जून २००६ रोजी किंवा पूर्वी निवड झालेली असावी, नियमित व कायम पदावर नियुक्ती असावी आणि एम.फिल. पदवी प्राप्त १ जानेवारी १९९४ ते ११ जुलै २००९ या कालावधीतील असावी, या तीन निकषांची पूर्तता करणाऱ्या एम. फिल.धारक प्राध्यापकांना नेट परीक्षेतून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सर्व विद्यापीठाच्या कुलसचिवांना एम. फिल.धारकांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. १२ विद्यापीठांतून १ हजार ४४७ प्रस्ताव प्राप्त झाले. प्रस्तावांची छाननी यूजीसीने करून त्रुटी उच्च शिक्षण विभागाकडे पाठविल्या. त्रुटींच्या पूर्ततेसाठी संचालक डॉ. देवळाणकर यांनी २४ डिसेंबर २०२४ रोजी १२ विद्यापीठातील कुलसचिवांची बैठक घेतली. पूर्तता झाल्यानंतर ‘यूजीसी’ने १४४७ पैकी १४२१ प्राध्यापकांना सूट देण्याचा निर्णय घेतला.

कोणत्या विद्यापीठातील किती प्राध्यापक?यूजीसीने सूट दिलेल्या प्राध्यापकांमध्ये मुंबई विद्यापीठातील ७२ प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १९६, शिवाजी विद्यापीठ १०९, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ २६, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ १२९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ३२१, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ३८८, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ १२३, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ३०, गोंडवाना विद्यापीठ ४९, एसएनडीटी महिला विद्यापीठ ३ आणि भारती विद्यापीठातील १ प्राध्यापकाचा यात समावेश आहे.

उच्च शिक्षण मंत्र्यांच्या पाठपुराव्याला यशयूजीसीने २०१० मध्ये अशाच पद्धतीने प्राध्यापकांना सूट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही राज्यातील प्राध्यापकांची संख्या पाहता उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, यूजीसी अध्यक्षांची भेट घेऊन सूट देण्याची मागणी केली हाेती. त्यानंतर यूजीसीने अशा प्राध्यापकांचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार उच्च शिक्षण विभागाने सर्व विद्यापीठांकडून प्रस्ताव मागवून ते प्रस्ताव यूजीसीला पाठवले. यूजीसीने त्यावर आता निर्णय घेतला आहे. उच्च शिक्षण मंत्र्यांनी केंद्र शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न निकाली निघाला.- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरProfessorप्राध्यापकcollegeमहाविद्यालय