शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

पतीनेच कु-हाडीने छाटले पत्नीचे मुंडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:53 IST

चारित्र्याच्या संशयावरून पतीने झोपेत कु-हाडीने पत्नीचे मुंडके छाटल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे मंगळवारी (दि.१४) रात्री घडली.

ठळक मुद्देचारित्र्यावर संशयावरून सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथील घटनाआरोपी पती फरार, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सिल्लोड/आमठाणा (औरंगाबाद) : चारित्र्याच्या संशयावरून पतीने झोपेत कु-हाडीने पत्नीचे मुंडके छाटल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे मंगळवारी (दि.१४) रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध खून व भादंवि कलम ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पती मात्र, फरार झाला असून सासू, सासरा व दीर, जाऊ या चौघांना अटक करण्यात आली आहे.

ठार झालेल्या महिलेचे नाव मंगलाबाई रवींद्र बनकर (३०, रा. देऊळगाव बाजार, ता. सिल्लोड) असे आहे, तर खून करणाऱ्या पतीचे नाव रवींद्र साहेबराव बनकर (३०, रा. देऊळगाव बाजार) असे आहे. याप्रकरणी मयत विवाहितेचे वडील सूर्यभान किसन सुसुंद्रे (रा. दीडगाव) यांच्या तक्रारीवरून पती रवींद्र बनकर, सासरा साहेबराव रामराव बनकर, सासू लंकाबाई साहेबराव बनकर, दीर अशोक साहेबराव बनकर, जाऊ शीतल अशोक बनकर (सर्व रा. देऊळगाव बाजार) यांच्याविरुद्ध खून व भादंवि कलम ४९८ अन्वये सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सासरा साहेबराव, दीर अशोक या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पती मात्र, फरार झाला असून रात्री उशीरा सासू, व जाऊला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, नको त्या स्थितीत पत्नीला पतीने अनेकदा बघितले होते. यानंतर समजूत घातल्यावरसुद्धा सुधारणा झाली नाही. यामुळे पती रवींद्र बनकर याने मंगळवारी रात्री २ वाजता झोपेतच पत्नीच्या मानेवर कु-हाडीने वार करून मुंडके धडावेगळे केले. यानंतर तो प्रेत जागेवरच सोडून फरार झाला. घटनेची माहिती गावात पोहोचताच ग्रामस्थांनी गर्दी केली होती.पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस अधिकारी, कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व गुन्ह्यात वापरलेली कु-हाड जप्त केली.

दरम्यान, लग्नात भांडे व हुंडा दिला नाही म्हणून सासरची मंडळी तिला नेहमी त्रास देत होती. तसेच माहेराहून पैसे घेऊन ये, अशी मागणी करून तिचा छळ करण्यात येत होता. आता तिच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती. ती मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्या मंडळीने मुलीचा खून केल्याची तक्रार मयत विवाहितेच्या वडिलांनी दिली आहे. सध्या खून नेमका कोणत्या कारणाने केला याचा तपाास पोलीस करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि. विश्वास पाटील, पोउनि. सावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. खबरदारी म्हणून देऊळगाव बाजार येथे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

अन् क्लिप केली व्हायरलआरोपी पती रवींद्रे याने तिचे दुस-यासोबत संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी खून करण्यापूर्वी एका मित्राच्या साहाय्याने मंगलाबाईशी फोनवर कॉन्फरन्सद्वारे संभाषण करून कुणासोबत अनैतिक संबंध आहे. याची कबुली करून घेतली. त्यानतर संभाषणाची क्लिप काही ग्रुपवर मंगळवारी रात्री १२ वाजता व्हायरल केली. यानंतर आरोपीचे पत्नीचा खून केला.

त्यानंतरच केले विवाहितेवर अत्यसंस्कारजोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी घेतली होती. अखेर पोलिसांनी त्वरित २ आरोपींना अटक करून उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले. यानंतर बुधवारी सायंकाळी सदर विवाहितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.