शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 13:50 IST

दारूच्या व्यसनाबद्दल दूषणे देणाºया पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली

औरंगाबाद: दारूच्या व्यसनाबद्दल दूषणे देणाºया पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास वाळूज येथील सिडको महानगरात उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची  नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.प्रवीण प्रभाकर पाटील (३२) आणि आरती प्रवीण पाटील (२६,दोघे रा.गुरूदक्षिणा अपार्टमेंट, सिडको वाळूज)असे मृत दाम्पत्याचे नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, प्रवीण हा एका खाजगी कंपनीत काम करायचा तर आरती ही गृहीणी होती. त्यांना ९वर्ष आणि दिड वर्षाची दोन मुले आहेत. प्रवीण राहत असलेल्या अपार्टमेंटमध्येच त्याची सासू-सासरे, भाऊ हे स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहात. प्रवीण अधूनमधून मद्य प्राशन करीत होता. त्यामुळे पती-पत्नीत वाद होत. तीन दिवसापूर्वी प्रवीण पुन्हा मद्य प्राशन करून आला होता. त्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि आरती रागाच्या भरात खालच्या मजल्यावर राहणाºया माहेरी दोन मुलांसह राहण्यास गेली. त्याचा राग प्रवीणला राग आला होता. पुन्हा मद्य न पिण्याचे वचन प्रवीणने  शुक्रवारी पत्नी आणि सासूसासरे यांना दिले. त्यानंतर रात्री या दाम्पत्याने आरतीच्या माहेरीच जेवण केले आणि मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास आरती दोन मुलांना सोबत घेऊन प्रवीणसोबत वरच्या मजल्यावरील त्यांच्या घरी गेली. समोरच्या हॉलमध्ये प्रवीणचे वडिल तर त्यांच्या बेडरूमध्ये दोन मुले झोपली होती.मध्यरात्रीनंतर प्रवीणने आरतीचा गळा आवळून खून केला,नंतर त्याने स्वयंपाक खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास मोठ्या मुलाच्या शाळेची वेळ झाली तरी कोणीही झोपेतून उठले नाही, म्हणून प्रवीणचे वडिल हॉलमधून आत गेले तेव्हा त्यांना प्रवीणने गळफास घेतल्याचे दिसले यावेळी खालच्या मजल्यावर जाऊन प्रवीणचा भाऊ आणि सासू-सासºयांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी आत जाऊन पाहिले असता आरती हिचा गळा घोटलेला दिसला. या घटनेची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि कर्मचाºयांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.