शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तब्बल तेरा वर्षांचा कारावास भोगल्यानंतर पतीसह सासू-सासरे निर्दोष मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:09 IST

पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तब्बल तेरा वर्षांचा कारावास भोगल्यानंतर पतीसह मृताचे सासू-सासरे यांची औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी जन्मठेपेची शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्तता केली.

ठळक मुद्देमयताच्या सासू -सासऱ्यांनाही सात वर्षांच्या कारावासानंतर जामीन

औरंगाबाद : पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तब्बल तेरा वर्षांचा कारावास भोगल्यानंतर पतीसह मृताचे सासू-सासरे यांची औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी जन्मठेपेची शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्तता केली.आरोपी पती अनिल विश्वनाथ पथवे (रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि.अहमदनगर) हा गेली १३ वर्षे कारागृहातच आहे. तर त्याचे आई-वडीलही सात वर्षे कारागृहात होते. त्यांना नंतर जामीन मंजूर झाला. या तिघांना संगमनेरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.मृत सीताबाईची आई शांताबाई यांनी फिर्याद दिली होती की, आरोपी अनिलचे लग्न २००३ मध्ये त्यांची मुलगी सीताबाई हिच्याशी झाले होते. १३ नोव्हेंबर २००५ रोजी सीताबाई घरातून गायब झाली. १६ नोव्हेंबर २००५ रोजी तिचा मृतदेह त्यांचे शेजारी केशव जगताप यांच्या विहिरीत आढळला होता. मृतदेहाचे जागेवरच दोन डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. प्राथमिक अहवालात त्यांनी सीताबाईचा बुडून मृत्यू झाल्याचे नमूद केले; परंतु अंतिम अहवालात गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद केले. अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मूलबाळ होत नसल्याने सीताबाईचा खून करण्यात आल्याचे यात म्हटले होते.संगमनेर सत्र न्यायालयाने अनिल, त्याची आई सावित्रीबाई आणि वडील विश्वनाथ पथवे यांना कलम ४९८ (अ) मधून मुक्त केले, पण खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरोधात तिघांनीही उच्च न्यायालयात अपील दाखल केले. सुनावणीदरम्यान खंडपीठाने प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी सत्र न्यायालयाकडे पाठविले. मात्र तिघांचीही शिक्षा सत्र न्यायालयाने कायम केली.या शिक्षेविरुद्ध तिघांनीही अ‍ॅड. व्ही. डी. सपकाळ यांच्यामार्फत खंडपीठात अपील दाखल केले. सुनावणीच्या वेळी म्हणणे मांडण्यात आले, की शवविच्छेदन करणाºया डॉक्टरांचे दोन अहवाल संशयास्पद आहेत. सीताबाई ही १३ नोव्हेंबरला गायब झाली आणि १६ ला तिचा मृतदेह आढळला. पती व सासरच्यांनी तिचा बराच शोध घेतला. पोलीस पाटील यांच्या जबाबात, मृत सीताबाई ही यापूवीर्ही दोन-तीन वेळा घरातून अचानक निघून गेल्याचे स्पष्ट झालेले आहे. तसेच हुंडाबळीच्या आरोपातून सत्र न्यायालयाने आरोपींना मुक्त केले आहे. आरोपी ठाकर समाजाचे आहेत. त्यांच्यामध्ये दोन विवाहाची प्रथा अजूनही आहे. त्यामुळे मूलबाळ होत नसल्याने खून करण्याचे काहीही सबळ कारण दिसून येत नाही. अ‍ॅड. सपकाळ यांना अ‍ॅड. आदिनाथ जगताप आणि अ‍ॅड.संदीप सपकाळ यांनी साह्य केले.--------------

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबादmurbadमुरबाड