शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

'दोघे संपले, दोघांमधील वाद संपला'; पत्नीच्या खुनानंतर फरार पतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 16:18 IST

Crime in Aurangabad : ज्ञानेश्वर काशिनाथ गाडेकर याचे पत्नी विमलबाई सोबत मागील काही वर्षांपासून वाद सुरु होते.

ठळक मुद्देवादाचे कारण काय होते याचा उलगडा दोघांच्या मृत्यूनंतर ही झालेला नाही.

फुलंब्री ( औरंगाबाद ) : तालुक्यातील गीरसावळी येथे दिवसांपूर्वी पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीने आज गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.  ज्ञानेश्वर गाडेकर असे मृताचे नाव आहे. 

ज्ञानेश्वर काशिनाथ गाडेकर याचे पत्नी विमलबाई सोबत मागील काही वर्षांपासून वाद सुरु होते. यामुळे अनेक वर्ष तो औरंगाबाद येथे राहत होता. मात्र, लॉकडाऊनमुळे तो गावाकडे आला. यानंतर पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद उफाळून आले. यातून त्याने बुधवारी ( दि २ ) विमलाबाईचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. खून केल्यापासून ज्ञानेश्वर फरार होता. मुलाच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस त्याच्या मागावर असतानाच आज सकाळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. ज्ञानेश्वरने डोगरकडेला असलेल्या गट ६१ मधील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फुलंब्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज ,फौजदार रघुवीर मुराडे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

दोघांसोबत वादही संपलापती-पत्नीमधील वाद विकोपाला जाऊन होत्याचे नव्हते कसे होते याचीच प्रचीती यावेळी आल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. अनेक वर्ष सुखी संसार चालला. दोन मुले व दोन मुली झाल्या. मात्र, अचानक दोघांमध्ये वाद सुरु झाले.  यातून पन्नाशी ओलांडलेल्या ज्ञानेश्वरला अनेक वर्ष बाहेरगावी राहावे लागले. तो परत आल्यानंतर ही त्यांच्यात जमले नाही. परिणामी वादाचा शेवट अत्यंत दुर्दैवी झाला. वादाचे कारण काय होते याचा उलगडा दोघांच्या मृत्यूनंतर ही झालेला नाही. शेवटी दोघांसोबत वाद ही संपला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद