शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २४ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या IAS पदोन्नतीमध्ये संघटनांचा खोडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 13:19 IST

पदोन्नती मिळणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनातील अंतर्गत गटबाजीदेखील यामुळे चव्हाट्यावर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील २४ उपजिल्हाधिकाऱ्यांना आयएएस पदोन्नती देण्याच्या हालचाली शासन दरबारी सुरू आहेत. महसूलमध्ये इतर सेवांच्या तुलनेत जास्त कोटा असल्यामुळे त्यांना पदोन्नती मिळणार आहे. यात मराठवाड्यातील चार उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. असे असले तरी महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटना, महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना आणि महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेने मुख्य सचिवांना निवेदन देऊन १ जानेवारी २०२३ च्या रिक्त पदांच्या अनुषंगाने देण्यात येणारी पदोन्नती प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी केली आहे. त्यात नियमांचे पालन झाले नाही असे संघटनांचे मत आहे. त्या संघटनांच्या मागणीमुळे पदोन्नती मिळणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनातील अंतर्गत गटबाजीदेखील यामुळे चव्हाट्यावर आली आहे.

सगळ्या न्यायालयीन प्रक्रिया झाल्या आहेत. उगाच खोडा घालण्याचा किंवा अर्धसत्य मांडण्याचा हा प्रकार आहे. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले होते. कुणी काय मागणी करावी, याला काहीही बंधन नाही. दोन महिन्यांपूर्वी नॉन स्टेट सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तिघांची पदोन्नती झालीच आहे. या सगळ्या निर्णयांची कॅटेगरी व नियम आहेत. केवळ हवा निर्माण करणे आणि गैरसमज करण्याचा हा प्रकार आहे. तुम्हाला जे काही मागायचे ते मागा, परंतु आमच्या पदोन्नतीमध्ये आडकाठी आणण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया एका उपजिल्हाधिकाऱ्याने नोंदविली.

नियम कसे बदलणार.तहसीलदार, उपजिल्हाधिकारी महाराष्ट्र नागरी सेवेतून येतात. त्यांच्यासाठी पदोन्नतीचा कोटा जास्त आहे. असे असताना सगळ्यांची कॉमन ज्येष्ठता यादी करावी आणि आयएएस पदोन्नतीचे निकष ठरवावे, अशी मागणी तीन संघटनांची आहे. महाराष्ट्र विकास सेवा, नगरविकास खात्याचे, मुख्य अधिकारी वर्ग १, उपायुक्त या कॅटेगरीतून सेवेत आलेल्यांनादेखील नागरी सेवेचे निकष असावेत, अशी मागणी काही संघटनांची आहे. परंतु पूर्वीपासून चालत आलेले नियम कसे बदलणार असा प्रश्न काही उपजिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

केस हरलेल्या संघटनांनी बोलू नये...ग्रामविकास अधिकारी संघटना कोर्टात केस हरले आहेत. त्यांनी चुकीचे निवेदने देऊन महाराष्ट्र शासनाची प्रतिमा केंद्र स्तरावर मलिन करू नये. गेल्या ७० वर्षांपासून महसूल अधिकारी नियमांनुसार भाप्रसे संवर्गात पदोन्नत होत आले आहेत. त्यामुळे या तिन्ही संघटनांना पदोन्नतीमध्ये खोडा घालण्याचा काही अधिकार नाही. या प्रकरणात आम्हीदेखील मुख्य सचिवांना निवेदन दिले आहे.- रवींद्र पवार,राज्य सरचिटणीस उपजिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी संघ.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादupscकेंद्रीय लोकसेवा आयोगState Governmentराज्य सरकारcollectorजिल्हाधिकारी