शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांमध्ये शेकडो शिक्षक विस्थापित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:19 IST

जिल्ह्यातील ५२७ शिक्षक विस्थापित झाले असून, यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील तब्बल १७३ शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांनी मागितलेल्या २० पैकी एकाही शाळेवर त्यांची बदली झाली नाही. उलट त्यांच्या जागेवर दुसरे शिक्षक बदलीने येणार असल्यामुळे या शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद : अनेक पती-पत्नी शिक्षकांची ताटातूट; नाराजीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या एकूण ३ हजार ५७५ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमार्फत वाटप करण्यात आले. कालपासून आपली बदली कुठे झाली, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या शिक्षकांनी सकाळपासूनच गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये गर्दी केली होती. दरम्यान, जिल्ह्यातील ५२७ शिक्षक विस्थापित झाले असून, यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील तब्बल १७३ शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांनी मागितलेल्या २० पैकी एकाही शाळेवर त्यांची बदली झाली नाही. उलट त्यांच्या जागेवर दुसरे शिक्षक बदलीने येणार असल्यामुळे या शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या ई-मेलवर जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांच्या बदलीचे आदेश आले; परंतु त्या बाहेरगावी असल्यामुळे शिक्षण विभागाला बदली आदेशास त्यांची मान्यता घेता आली नव्हती. त्यामुळे काल शिक्षकांना बदली आदेश बजाविण्यात आले नव्हते. पवनीत कौर या सोमवारी रात्री औरंगाबादेत आल्या. शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांनी मंगळवारी सकाळीच शिक्षकांच्या बदली आदेशावर त्यांची स्वाक्षरी घेतली व तात्काळ सर्व नऊ गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे शिक्षकांचे बदली आदेश सुपूर्द केले. शिक्षकांनीही गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये बदलीचे आदेश मिळविण्यासाठी गर्दी केली होती.शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठा गोंधळ उडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये आॅनलाईन बदली प्रक्रियेत कनिष्ठांनी वरिष्ठांना खो देणे, नियमानुसार २० शाळांचे पर्याय दिलेले असतानादेखील एकही शाळा न मिळणे, पती-पत्नी एकत्रीकरणाऐवजी ३० कि.मी.पेक्षा जास्त अंतरावर त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली होणे, पती-पत्नीपैकी एकाला बदली मिळाली आणि दुसºयास विस्थापित व्हावे लागले. पती-पत्नी दोघेही विस्थापित होणे, ५३ वर्षांवरील शिक्षकांना बदली न मिळणे, अशा अनेक प्रकारे शिक्षकांवर अन्याय झाल्याची चर्चा मंगळवारी औरंगपुºयातील जि.प. कन्या प्रशालेत बदली आदेश वितरण केंद्राच्या ठिकाणी ऐकायला मिळाली.दरम्यान, विस्थापित शिक्षकांसाठी ३१ मेपर्यंत आॅनलाईन अर्ज करण्याची मुभा बदलीच्या राज्यस्तरीय कक्षाने दिली आहे. या शिक्षकांना नव्याने २० शाळांचे पर्याय नोंदवावे लागतील.दिलेल्या पर्यायांपैकी पुन्हा शाळा मिळाली नाही, तर त्यांना मग, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी निर्देशित केलेल्या शाळेवर रुजू व्हावे लागणार आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabadऔरंगाबादzp schoolजिल्हा परिषद शाळाTransferबदली