शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीकेसीवरील दसऱ्या मेळाव्यासाठी अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडहून शेकडो गाड्या रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 18:42 IST

सिल्लोडमधून तब्बल ५०० वाहनातून २५ हजार कार्यकर्ते बिकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी गेल्याचा दावा

सिल्लोड (औरंगाबाद):  सिल्लोड तालुक्यातून शेकडो एसटी आणि खाजगी बसेस आज सकाळी ११ वाजेपासून टप्याटप्याने मुंबईला मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी रवाना झाल्या. यामुळे जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलीस आणि स्वयंसेवकांनी वाहतूक सुरळीत केली.  

आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी सिल्लोड येथील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयात गर्दी केली होती. त्यानंतर सकाळी ११ वाजेपासून एसटी आणि खाजगी बससह इतर लहान मोठ्या वाहनातून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले. मंत्री सत्तार यांच्या सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातून तब्बल ५०० वाहनातून २५ हजार कार्यकर्ते बिकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी गेल्याचा दावा करण्यात येत आहे.

प्रत्येक गाडीत चहा, जेवणाची सोय सिल्लोड येथून तब्बल २५ हजार कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत मी देखील मुंबईला रवाना होत आहे. प्रत्येक गाडीत चहा, नाष्ट्याची सोय आहे. मुंबई विद्यापीठाच्या मैदानावर सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथेच फिरत्या स्वच्छता गृहाची व्यवस्था आहे. - अब्दुल सत्तार, कृषीमंत्री

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदे