शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

संस्था चालकांच्या जाचामुळे शेकडो प्राध्यापकांचे विद्यापीठातील भरतीला प्राधान्य

By राम शिनगारे | Updated: September 29, 2023 18:57 IST

असोसिएट नाही तर किमान असिस्टंटला संधी मिळण्यासाठी प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांमध्ये ७३ प्राध्यापकांच्या जागा भरण्यासाठी नुकतीच जाहिरात निघाली हाेती. त्यामध्ये महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ कार्यरत शेकडो प्राध्यापकांनी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. संस्था चालकांच्या नेहमीच्या जाचामुळे महाविद्यालयांपेक्षा विद्यापीठ बरे म्हणून अनेकांनी अर्ज केले आहेत. अनुभवाच्या आधारावर असोसिएटसाठी अर्ज केलेले असतानाच असिस्टंटलही प्राधान्य दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विद्यापीठात प्राध्यापकांच्या ७३ जागांमध्ये ३ प्रोफेसर, २० असोसिएट आणि ५० असिस्टंट प्रोफेसरच्या जागा आहेत. त्यासाठी तब्बल ५ हजार ८१५ जणांनी अर्ज केले आहेत. असिस्टंट प्रोफेसरसाठी बेरोजगार पात्रताधारकांना प्राधान्य देण्यात येते. मात्र, सध्या विविध महाविद्यालयांमध्ये असिस्टंट, असोसिएट या पदावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांनी संस्था चालकांच्या जाचातून सुटका करून घेण्यासाठी विद्यापीठात अर्ज केल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी दिली.

ही आहेत अर्ज करण्याची कारणेशिक्षण संस्थेत एकापेक्षा अधिक महाविद्यालये असल्यास नियमित बदल्या केल्या जातात. पदोन्नती (कॅश), नॅकसाठी संस्थाचालक वर्गणी गोळा करतात. त्याशिवाय संस्था चालकांच्या कुटुंबातील भाऊ, दादा, भैया, नाना, आप्पांच्या वाढदिवसाचा खर्चही प्राध्यापक यांनाच करावा लागतो. हे सर्व प्रकार न केल्यास संबंधितांना निलंबित केले जाते. पदोन्नती थांबवली जाते. वैद्यकीय बिलांतून विशिष्ट टक्केवारी संस्था चालकास द्यावी लागते. त्याशिवाय संस्था चालकांची वैयक्तिक कामे, निवडणूक प्रचारात सहभागी व्हावे लागते. त्यासाठीही प्राध्यापक यांनाच पैसे खर्च करावे लागत असल्याची माहिती नाव छापण्याच्या अटीवर प्राध्यापकांनी दिली.

पैठणच्या प्रतिष्ठान संस्थेचा नकारपैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयातील प्राध्यापकांना विद्यापीठात अर्ज करण्यासाठी परवानगीच दिली नाही. थेट राजीनामा देऊनच अर्ज करा, असे फर्मान सोडले. त्यामुळे कोणीही अर्ज केला नसल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी संस्थेचे सचिव राजेंद्र शिसोदे यांना विचारले असता ते म्हणाले, सगळेच जण सोडून गेले तर आम्ही काय करायचे? आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोण शिकविणार, असा प्रश्न निर्माण होईल. राज्यशासन नवीन भरतीला परवागनी देत नाहीत. त्यामुळे कोणालाही अर्ज करण्यास परवानगी दिली नाही.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण