शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत शंभर वर्षांपूर्वीची इमारत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:18 IST

बेगमपुरा भागातील थत्ते हौद येथील शंभर वर्षे जुनी इमारत शुक्रवारी पहाटे ५ वाजता अचानक कोसळली. शेजारील एका घरावर तीन मजली इमारतीचा मलबा कोसळला. मध्यरात्री मोठ्या इमारतीमधून आवाज येत असल्याने तीन कुटुंबियांनी सामानासह घर सोडले होते.

ठळक मुद्देबेगमपुरा : मध्यरात्री इमारती रिकाम्या; पाच कुटुंबे बचावली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बेगमपुरा भागातील थत्ते हौद येथील शंभर वर्षे जुनी इमारत शुक्रवारी पहाटे ५ वाजता अचानक कोसळली. शेजारील एका घरावर तीन मजली इमारतीचा मलबा कोसळला. मध्यरात्री मोठ्या इमारतीमधून आवाज येत असल्याने तीन कुटुंबियांनी सामानासह घर सोडले होते. शेजारील ज्या घरावर इमारत कोसळण्याचा अंदाज होता ते घरही रिकामे करण्यात आले होते. त्यामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मनपाच्या अग्निशमन, अतिक्रमण हटाव विभागाने मलबा दूर केला.बेगमपुऱ्यातील गणपती मंदिरासमोर अरुण परदेशी आणि कैलास परदेशी यांचे दुमजली घर आहे. या घराला लागूनच माधवराव राऊत यांनी १९९१ मध्ये दुमजली जुने घर खरेदी केले होते. त्यांची मुले अशोक, कृष्ण आणि नीलेश यांनी दुमजली इमरतीवर आणखी एक मजली बांधकाम केले. १०० वर्षे जुन्या तळमजल्याची क्षमताही राऊत कुटुंबियांनी तपासली नाही. तळमजल्यावर एक किराणा दुकानही थाटण्यात आले होते. शुक्रवारी रात्री १० वाजेपासून तळमजल्यावरील इमारतीवर प्रचंड ताण येऊ लागल्याने आवाज येऊ लागला. इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते याचा अंदाज राऊत कुटुंबियांना आला. त्यांनी इमारत रिकामी केली. इमारतीत दोन गरीब भाडेकरूही होते. त्यांनीही सामानासह घर सोडले. पहाटे पाच वाजता इमारत पत्त्यासारखी अरुण परदेशी आणि कैलास परदेशी यांच्या दुमजली घरावर कोसळली. परदेशी यांनीही घर रिकामे केले होते. त्यामुळे दोन्ही इमारतीमधील रहिवाशांना दुखापत झाली नाही. इमारत कोसळण्याचा आवाज होताच आजूबाजूचे रहिवासी झोपेतून खडबडून जागे झाले व मुलाबाळांसह बाहेर पडले. इमारत कोसळल्याने सर्वत्र मातीचे लोट पसरले होते. वीजपुरवठा खंडित झाला होता. इमारतीमध्ये कोणी अडकले तर नसेल, असे प्रत्येकाला वाटत होते. काही वेळेनंतर सर्व सुखरूप असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक सचिन खैरे, माजी नगरसेवक गणू पांडे यांच्यासह परिसरातील नागरिक मदतीला धावले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्वरित अग्निशमन दलाला घटनास्थळी पाठविले. काही वेळेनंतर अतिक्रमण हटाव पथकाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. जेसीबीच्या साह्याने मलबा दूर करण्यात आला.शेजारच्या घराचे मोठे नुकसानराऊत यांची तीन मजली इमारत परदेशी कुटुंबाच्या घरावर कोसळली. हे कटुंब अगोदरच अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे. दोन भाऊ दुमजलीत राहत होते. कै लासच्या पत्नीने घरातच ब्युटीपार्लरचा व्यवसाय सुरू केला होता, तर अरुण हा कुल्फी, तर कधी पाणीपुरीच्या गाडीवर उदरनिर्वाह करतो. या घटनेने परदेशी कुटुंब रस्त्यावर आले. त्यांना त्वरित एका भाड्याच्या खोलीत राहण्याची व्यवस्था केली आहे. शनिवारी त्यांना आर्थिक मदतही करण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक गणू पांडे यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद