शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 17:07 IST

छत्रपती संभाजीनगरची कन्या बारावीत राज्यात प्रथम, वाणिज्य शाखेत १०० टक्के मार्क मिळवत तनिषा बोरामणीकरची जबरदस्त कामगिरी

छत्रपती संभाजीनगर: बारावी बोर्डाचा आज ऑनलाइन निकाल जाहीर झाला आहे. यात शहरातील तनिषा बोरामणीकर हिने वाणिज्य शाखेत १०० टक्के गुण मिळवत जबरदस्त कामगिरी केली आहे. तनिषा ही नामवंत बुद्धिबळपटू असून स्पोर्टच्या अतिरिक्त गुणांचा देखील तिच्या यशात समावेश आहे. वाणिज्य शाखेतून राज्यात सर्वप्रथम आल्याने तनिषाचे कौतुक होत आहे.

तनिषा रेणुका सागर बोरामणीकर ही बुध्दिबळ पटू आहे. तिला दहावीत ९८ टक्के गुण होते. त्यानंतर देवगिरी महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत तिने प्रवेश घेतला. बारावीच्या अभ्यासासोबतच तनिषाचा देशभर बुध्दीबळ स्पर्धांत सहभाग होता. बारावीत देखील ९५ टक्केच्या पुढे गुण मिळतील अशी आशा तिने बाळगली होती. आज निकाल लागल्यानंतर वाणिज्य शाखेत ६०० पैकी ६०० गुण मिळवत तनिषाने इतिहास रचला. विशेष म्हणजे, तिन्ही शाखेत मिळून १०० टक्के गुण मिळवणारी तनिषा एकमेव ठरली आहे. तनिषा नामवंत बुध्दिबळ खेळाडू असून तिने देश पातळीवरील बुध्दिबळाच्या अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. यामुळे स्पोर्ट्सच्या अतिरिक्त गुणांचा तिला लाभ झाला. 

आधी 'सीए' नंतर 'यूपीएससी'तनिषाची आई रेणुका या सीए असून वडील सागर आर्किटेक्ट आहेत. या यशात  देवगिरी काॅलेजच्या प्राध्यापकांचे आणि आई-वडीलांचे मार्गदर्शन लाभल्याचे तनिषाने सांगितले. आता 'सीए' होण्याचे ध्येय असून असून त्यानंतर 'यूपीएससी' देखील करणार असल्याची तनिषाने सांगितले.

दोन महिन्यात खूप मेहनत घेतली शेवटच्या दोन महिन्यात मी खूप मेहनत घेतली. मागील प्रश्न पत्रिकांचा सराव केल्याने नक्कीच खूप फायदा झाला. याशिवाय बुद्धिबळाच्या खेळाची खूप मदत झाली. माझे आकलन वाढले आहे. स्पोर्टचे १८ गुण देखील मिळाले आहे. यामुळे पैकीची पैकी गुण मिळाले. - तनिषा बोरामणिकर

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालAurangabadऔरंगाबादexamपरीक्षा