शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हे कसे जमणार सरकार? फळपीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त ३१ तासांचा दिला वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:48 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यानुषंगाने शासनाने पीकविमा योजना लागू केली असली तरी लालफितीच्या नोकरशाहीमुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडत आहे.

- यादवकुमार शिंदे

सोयगाव : संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष या ४ फळपिकांचा विमा काढण्यासाठी राज्य सरकारकडून फक्त ३१ तासांचा वेळ देण्यात आल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यानुषंगाने शासनाने पीकविमा योजना लागू केली असली तरी लालफितीच्या नोकरशाहीमुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडत आहे. फळपिकांचा विमा काढण्यासाठीचे राज्याच्या कृषी आयुक्तांनी १३ जून रोजी सायंकाळी ५:०० वाजता सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना पत्र पाठवले. त्यात फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करावी, असे सांगितले. तसेच संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष या चार पिकांचा विमा काढण्याची अखेरची मुदत १४ जून रोजी रात्री १२:०० वाजेच्या आत दिली. त्यामुळे ३१ तासांमध्ये या फळपिकांचा संबंधित शेतकऱ्यांनी विमा कसा काढावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. यातच अनेक शेतकऱ्यांना या फळपिकांचा विमा काढता आला नाही. याबाबत तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडीले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राज्य शासनाने यंदा आठ फळपिकांसाठी विमा योजना राबवली आहे. शनिवारी दिवसभर शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत; परंतु, काही पिकांना एक दिवसाचाच वेळ मिळाल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे. कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारला मुदत वाढविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे या चारही फळपिकांसाठी मुदत वाढून मिळण्याची शक्यता आहे.

कोणती कागदपत्रे आवश्यक ?योजनेसाठी अर्ज करताना ॲग्रिस्टॅक नोंदणी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन उतारा, जिओ टॅग फोटो, ई-पीक पाहणी असणे बंधनकारक आहे. ही सर्व कागदपत्रे ३१ तासांत जमवणे, या योजनेची माहिती घेणे आणि पैशांची तजवीज करून अर्ज करणे शक्य आहे का? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. शिवाय एकाच दिवशी एकाच वेबसाइटवर राज्यातील सर्व शेतकरी अर्ज करू लागले तर विमा पोर्टल सुरळीत चालणार का, असा प्रश्न निर्माण होतो. १४ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता विमा पोर्टल वेबसाइटला एरर येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे घाईत तयारी केलेल्या शेतकऱ्यांनाही या फळपिकांचा विमा काढता आला नाही.

अन्य कोणत्या पिकांना किती मुदत ?चिकू, मोसंबी पिकांसाठी ३० जून, डाळिंब पिकासाठी १४ जुलै, तर सीताफळ पिकाचा विमा काढण्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

विम्याची मुदत वाढेलफळबाग पीक विमा योजनेंतील लिंबू, पेरू, द्राक्ष आणि संत्रा या पिकांचा विमा काढण्यासाठी १३ जून रोजी संकेतस्थळ सुरू झाले आणि १४ जूनपर्यंत विमा काढण्यास मुदत होती. ही बाब कृषी आयुक्तालयांस कळविली आहे. या फळपिकांच्या विम्याची मुदत नक्की वाढेल.-प्रकाश देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी