शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा बंगला फोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:19 IST

आकाशवाणीमागील मित्रनगर येथील निवृत्त अप्पर जिल्हाधिका-यांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी चांदीच्या वस्तू, रोख रक्कम आणि किमती साड्या चोरून नेल्या. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आकाशवाणीमागील मित्रनगर येथील निवृत्त अप्पर जिल्हाधिका-यांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी चांदीच्या वस्तू, रोख रक्कम आणि किमती साड्या चोरून नेल्या. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.पोलिसांनी सांगितले की, मित्रनगर येथे भगवान लांडगे हे निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी पत्नीसह राहतात. ११ जुलै रोजी ते पत्नीसह पुणे येथे राहणा-या मुलांकडे गेले होते, तेव्हापासून त्यांच्या बंगल्याला कुलूप होते. ही संधी साधून चोरटे शेजारच्या बंगल्याच्या गच्चीवरून लांडगे यांच्या बंगल्याच्या गच्चीवर गेले. गच्चीवरील जिन्याच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडला. त्यानंतर चोरट्यांनी आतील लोखंडी ग्रीलचे दोन कुलूप तोडून आत प्रवेश केला. बंगल्यात सीसीटीव्ही असल्याची माहिती चोरट्यांना होती, त्यामुळे चोरट्यांनी सर्वप्रथम जिन्यातील कॅमे-याचे वायर तोडले. त्यानंतर ते खालच्या मजल्यावर आले. तेथील दुसरा कॅमेरा त्यांनी काढून घेतला. चोरट्यांनी त्यानंतर वेगवेगळ्या बेडरूममध्ये जाऊन क पाट उघडून त्यातील चांदीच्या वस्तू आणि सुमारे २० ते २२ हजारांची रोकड उचलली. त्यानंतर चोरटे तळमजल्यावरील बेडरूममध्ये गेले. तेथील कपाटातील किमती साड्या आणि किरकोळ रक्कम घेऊन आल्या मार्गाने पसार झाले.बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लांडगे परिवार गावाहून घरी आला, तेव्हा त्यांना समोरच्या हॉलमध्ये छत्री पडलेली दिसली. ती छत्री त्यांच्या मालकीची नव्हती. गावी जाताना बंद केलेले दिवे सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनासआले.चोरट्यांनी घर फोडल्याचा संशय त्यांना आल्यानंतर लांडगे दाम्पत्याने बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता कपाटातील सर्व साहित्य आणि कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती तातडीने जवाहरनगर पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक शरद इंगळे आणि गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ठसे तज्ज्ञालाही घटनास्थळी पाचारण केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

टॅग्स :Thiefचोर