लातूर: घरगुती वापराच्या सिलिंडरचा वापर व्यवसायात वापरणाऱ्या ढाबे, हॉटेल, खानावळी आदी ठिकाणी छापे टाकून पुरवठा विभागाने शनिवारी रात्री १३ घरगुती वापराचे सिलिंडर जप्त केले आहे़ घरगुती वापराचा सिलिंडर हॉटेलमध्ये वापरणे गुन्हा असतानाही वापर करणाऱ्या आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यासाठी लातूरच्या तहसीलदारांनी मोहिम हाती घेतली आहे़ रविवारी लातूर शहरातील ९ हॉटेलमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ८ जून रोली ‘लोकमत’ने ‘घरगुती सिलिंडरवर व्यवसायिकांची वाफ’ असे वृत्त प्रकाशित करताच पुरवठा विभाग खडबडून जागे झाले आहे़ पुरवठा विभागाकडून कारवाई मोहिमेला गती देणार असल्याचे सांगण्यात आले़ शनिवारी लोकमत चमूने लातूर शहरातील विविध हॉटेल, खानावळी, ढाबे आदी ठिकाणची पाहणी केली होती़ घरगुती वापराचे सिलिंडर व्यवसायासाठी वापरणे कायद्याने गुन्हा असतानाही अनेक हॉटेलात ‘चलता है’मुळे घरगुती सिलींडरची वाफ सुरू असल्याचे आढळून आले़ औसा रोड, नांदेड रोड, बार्शी रोड व अंबाजोई रोड यासह गावभागात घरगुती सिलींडर वापराची पाहणी करण्यात आली होती़ अनेक ठिकाणी हॉटेलात याच सिलेंडचा वापर अधिक असल्याचे आढळून आले़ याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ़ अनंत गव्हाणे यांना शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास संपर्क साधण्यात आला़ घरगुती सिलींडरचा वापर वाणिज्यिक कारणासाठी वापरणे गुन्हा असल्याचे सांगत, तुम्ही ठिकाण सांगा कारवाई करतो, असे आश्वासन दिले होते़ लोकमत चमूने शहरात फेरफटका मारल्याची प्रशासनाला कुणकुण लागताच रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शहरातील काही भागात पुरवठा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी छापे मारत कारवाया केल्या़ यापूर्वीही पुरवठा विभागाने काही हॉटेलात छापे टाकून घरगुती वापराचे सिलींडर जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत़ प्रशासनाकडून वापरकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात असले ज्यांच्याकडून सिलेंडर घेतले जातात, त्या एजन्सीधारकांवर कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही़ शहर व परिसरात दोन हजारांपेक्षा अधिक हॉटेल, खानावळी आहेत़ बहुतांश ठिकाणी घरगुती वापराचेच सिलेंडर वापरण्यात येतात़ मोहीम तीव्र करणाऱ़़़कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने दैनंदिन मोहिम राबविणे शक्य नसले तरी कारवाया सुरूच असतात़ गेल्या चार महिन्यात ६० सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत़ मार्चमध्ये ४, एप्रिल ११, मे महिन्यात ३२ सिलेंडर जप्त केले असून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आली आहेत़ आठ दिवसांपूर्वी घरगुती सिलेंडरचे व्यवसयिक सिलेंडर तयार करणाऱ्या मळवटी रोडवरील एका ठिकाणी छापा टाकून ३२ सिलेंडर पोलिस व तहसीलच्या पथकाने जप्त केले आहेत़ वाणिज्यिक वापरासाठी घरगुती सिलेंडर वापरू नका, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असे तहसीलदार महेश शेवाळे यांनी सांगितले़जास्तीचे सिलेंडर मिळतात कोठूऩ़़पुरवठा विभागाच्या पथकांकडून वर्षभरात कधीतरी कारवाया केल्या जातात़ ज्या एजन्सीधारकाकडून सिलेंडर घेतले जातात ते सिलेंडर एकाच नावाने एवढे मिळतात कसे? मिळत असतील तर ते कोणाच्या नावाने घेतात, त्यांच्याकडे एवढ्या शिधापत्रिका आल्या कोठून? याबाबची सखोल चौकशी होत नाही़ शहर व परिसरात दोन हजारांपेक्षा अधिक हॉटेलचालक आहेत, बहुतांश ठिकाणी असे सिलेंडर वापरण्यात येतात़ घरगुती ग्राहकांना अनेकदा वेटिंगवर ठेवले जाते, हॉटेलचालकांना मात्र काही क्षणातच सिलेंडर उपलब्ध होतात, याचा शोध घेणे गरजेचे आहे़ आणखी वृत्त / हॅलो २ वर
हॉटेल्सवर धाडी; कारवाया सुरु
By admin | Updated: June 9, 2014 00:08 IST