शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समर्थक आमदारांना खुश ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जावयासारखा पाहुणचार: अंबादास दानवे

By बापू सोळुंके | Updated: August 17, 2023 18:27 IST

विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवेंची मिश्किल टिका

छत्रपती संभाजीनगर: आमदारांना खूश ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच मुंबईत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भोजन दिले आहेत. कालपर्यंत महिनाभर अधिक मासामध्ये ज्या पध्दतीने जावयांना धोंड्याचा पाहुणचार करण्यात आला, तसाच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समर्थक आमदारांना जावयाप्रमाणे धोंड्याचे जेवण दिले असावे,अशी मिश्किल टिका विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी गुरूवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. 

छत्रपती संभाजीनगरातील क्रांतीचौक येथील संपर्क कार्यालयात  पत्रकारांशी पत्रकारांशी संवाद साधताना आ.दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्तेत असूनही त्यांना आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये भोजन द्यावे लागते. ज्यांचे हात दगडाखाली असतो, त्यांना अशा प्रकारे आमदारांना जावयासारखी वागणूक द्यावी लागते. कारण दगडाखालचा हात काढला तर तोच दगड अंगावर पडू शकतो,अशी भिती असते.शहरातील गुन्हेगारीविषयी बोलताना ते म्हणाले की, शहरातील गुन्हेगार मोकाट सुटले आहे. खुलेआम गुन्हेगार पिस्टल घेऊन फिरतात. ही बाब पोलिसांना माहिती नसते असे नाही. परवा एका सोनाचे सोनं चोरीला गेले किती आणि जप्त किती केले, याचे गणित जुळत नाही. एक डिसीपी चारचौघांना उडवतो,मात्र त्याच्यावर कारवाई होत नाही. शहर पोलीस विभाग वसूलीत गुंतल्याचे दिसते. याविषयी कितीती तक्रारी करा पण कारवाई होत नसल्याचे जानवते.

अधिकाऱ्यांनी खाबूगिरी  कमी केले तर कोणत्याही दौऱ्याची गरज नाहीमहाराष्ट्रातील राज्यातील खड्ड्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांचे पथक अभ्यास दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडच्यादौऱ्यावर गेले आहे.  महाराष्ट्र आणि या दोन्ही देशातील हवामान सारखे नाही. यामुळे तेथील रस्त्याचा नियम महाराष्ट्रातील रस्त्यासाठी लागू होत नाही. केवळ अधिकाऱ्यांना पाठवायचे म्हणून पाठवलेले दिसते.  अधिकाऱ्यांनी खाबूगिरी कमी केली तर सर्व रस्ते व्यवस्थित होती. 

आ.रोहित पवार यांनी घेतली दानवेंची भेटदोन दिवसांपासून शहराच्या दौऱ्यावर असलेले कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार यांनी गुरूवारी सकाळी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांची त्यांच्या क्रांतीचौक येथील संपर्क कार्यालया भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आ. चंद्रकांत दानवे  तसेच दोन्ही पक्षाचे स्थानिक पदाधिकारी होते.यावेळी  विरोधीपक्षनेते पदावर विराजमान झाल्यापासून आ. दानवे हे राज्यात उत्तम कामगिरी करीत असल्याचे आ.राेहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेEknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबाद