शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

घाटी रुग्णालयाच्या ‘सुपर स्पेशालिटी’त रुग्णसेवेला उजाडणार २०१९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 17:55 IST

घाटी रुग्णालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येणाऱ्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी विभागात रुग्णसेवेला २०१९ उजाडण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्दे. पाच मजली इमारतीचे आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.उर्वरित ३० टक्के काम पूर्ण होण्यासाठी आणखी पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येणाऱ्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी विभागात रुग्णसेवेला २०१९ उजाडण्याची चिन्हे आहेत. पाच मजली इमारतीचे आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३० टक्के काम पूर्ण होण्यासाठी आणखी पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 

२५३ खाटांच्या सुपर स्पेशालिटी विभागाच्या इमारतीचे काम डिसेंबर २०१७ अखेर करण्याची मुदत होती; परंतु अनेक कारणांमुळे हे काम कासवगतीने सुरू आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मार्चअखेर या इमारतीचे काम पूर्ण होईल,असे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले होते; परंतु या इमारतीचे काम अजूनही सुरूच आहे. अद्यापही ३० टक्के कामे या ठिकाणी शिल्लक आहे. जलवाहिनी, ड्रेनेजलाईन आदी कामांचा त्यात समावेश आहे. सगळी कामे पूर्ण होऊन रुग्णसेवेसाठी इमारत सज्ज होण्यासाठी होण्यासाठी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिना लागेल,असे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. दुसरीकडे पदनिर्मिती आणि पदस्थापनेची देखील प्रतीक्षा आहे. हा प्रस्ताव शासनस्तरावर पडून आहे. 

या विभागात हृदयरोग, मेंदूविकार, मूत्रपिंड विकार यांसह विविध सुपर स्पेशालिटीचे सर्व उपचार उपलब्ध केले जाणार आहेत. विभागाच्या इमारतीचे काम पूर्ण होताच विभाग रुग्णसेवेत दाखल होणे आवश्यक आहे; परंतु इमारत पूर्ण झाल्यानंतरही रुग्णसेवेची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लवकरच कामे पूर्ण सुपर स्पेशालिटी विभागाच्या इमारतीचे काम मार्च महिनाअखेर पूर्ण होणार होते; परंतु कामे पूर्ण होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. आॅक्टोबरपर्यंत सगळी कामे पूर्ण होतील,अशी अपेक्षा आहे. पदासंदर्भातही प्रस्ताव देण्यात आलेला आहे.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीHealthआरोग्यdoctorडॉक्टर