शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचे टिप्पर आणि काळीपिवळी जीपमध्ये भीषण अपघात; ३ जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 23:26 IST

औरंगाबाद- जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील चिंचखेडा येथे घडलेल्या या अपघातात तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

सिल्लोड: वाळू भरण्यासाठी जाणारे टिप्पर व काळीपिवळी टॅक्सीत समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. औरंगाबाद- जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील चिंचखेडा येथे घडलेल्या या अपघातात तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.       शेख सलीम शेख रहीम वय 40 स्नेहनगर, सय्यद कासिम सय्यद लियाकत वय 36 ईदगाह नगर सिल्लोड व अन्य एक अनोळखी अशी जखमींची नावे आहेत. रात्री १०:०० वाजेपर्यंत सुद्धा तेथे पोलीस हजर नव्हते.

औरंगाबादहून सिल्लोडकडे येणारी काळी -पिवळी टॅक्सी (क्रमांक एम एच २०डी एफ ००९२) आणि के-हाळा येथील पूर्णा पात्रात वाळू भरण्यासाठी भरधाव वेगाने जाणारा टिप्पर (क्रमांक एम एच २१ एक्स ३९५१)  यांच्यात रात्री ८ वाजेच्या सुमारास चिंचखेडा येथे हॉटेल फोरसिझन समोर जोरदार धडक झाली.  भीषण अपघात दोन्ही वाहनांनी तीन ते चार पलट्या खाऊन रोडच्या बाजूला पडली होती. दोन्ही वाहनांचे दोन तुकडे होऊन इतरत्र पडले होते. महामार्गावर काचेचा सडा पडलेला होता.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद