शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

माणिक हॉस्पिटलला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:47 IST

गारखेडा परिसरातील माणिक हॉस्पिटलच्या तळमजल्याला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. प्रसंगावधान राखून शेकडो नागरिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असलेल्या ३३ रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गारखेडा परिसरातील माणिक हॉस्पिटलच्या तळमजल्याला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. प्रसंगावधान राखून शेकडो नागरिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असलेल्या ३३ रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, हॉस्पिटलची लाखो रुपयांची यंत्रणा जळून खाक झाली.गारखेडा परिसरातील माणिक हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरला सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. तेथील तळमजल्यातील इलेक्ट्रिक पॅनल गरम होऊन स्पार्किंग होऊन आग भडकली. तेथेच दुरूस्तीचे काम सुरू असल्याने काही कामगार वेल्डिंग करीत होते. आग भडकताच सर्व कामगार तेथून पळतच बाहेर पडल्याचे प्रत्यक्षदर्र्शींनी सांगितले. त्यानंतर त्यांनी आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी आग आग म्हणून ओरडण्यास सुरुवात केली. आग विझविण्यासाठी तेथे असलेली अग्निशमन यंत्रे वापरण्याचा प्रयत्न केला,मात्र ती बंद असल्याने त्याचा उपयोग झाला नाही,असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परिणामी अग्निशमन दलाच्या बंबाचीच प्रतिक्षा करावी लागल्याने आगीने भडका घेतला. दरम्यान हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.उल्हास कोंडापल्ले यांनी मात्र आग विझविण्यासाठी हॉस्पिटलमधील अग्निशमन यंत्रणा वापरल्याचे सांगितले. अग्निशमनची गाडी पंधरा मिनिटांत तेथे दाखल झाली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने हॉस्पिटलच्या तिस-या मजल्यापर्यंत धूरच धूर पसरला. १०० खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये १५ खाटांचा आयसीयू आहे. वरच्या मजल्यापर्यंत धूर गेल्याने तेथे अ‍ॅडमिट ३३ रुग्णांचा जीव कासावीस झाला. नातेवाईकांमध्ये धावपळ सुरू झाली. पोलीस कर्मचारी दीक्षित यांचे वडील येथे अ‍ॅडमिट आहेत. त्यांनी खिडकीच्या काचा फोडल्याने धूर निघू लागला.पोलीस, अग्निशमन दल आणि नागरिकांची मदतहॉस्पिटलमधून धूर येत असल्याचे पाहून परिसरातील नागरिक , जवाहरनगर पोलिसांनी मदतीसाठी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तेथील अग्निशमन यंंत्रणा ठप्प असल्याचे पाहून अनेकांनी खंत व्यक्त केली. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत अग्निशमनची गाडी घटनास्थळी दाखल झाली.अग्निशमनच्या काही कर्मचाºयांनी आग विझविण्याकडे तर काहींनी शिडी लावून वरच्या मजल्यावर अडकलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. अवघ्या ३० मिनिटांत सर्व रुग्णांना शिडीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आले.आगीच्या कारणाचा, नुकसानीचा शोध सुरू -डॉ. कोंडपल्लेया घटनेविषयी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. उल्हास कोंडपल्ले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले की, सकाळी ११ वाजता तळमजल्यावर आगीने भडका घेतला, तेव्हा तातडीची अग्निशमन यंत्रणा वापरण्यात आली. मात्र, आगीच्या धुराचे लोट वरच्या मजल्यापर्यंत गेल्याने आंतररुग्ण विभागात अ‍ॅडमिट ३३ रुग्ण तातडीने वेगवेगळ्या मार्गाने बाहेर काढून त्यांना अन्य रुग्णालयांत दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू ठेवण्यात आले. आग विझविण्याच्या कामात मनपा अग्निशमन विभागासह नागरिकांनी मोलाचे योगदान दिले. तळमजल्यावरील आगीवर वेळीच नियंत्रण मिळविता आल्याने जीवित हानी झाली नाही. आगीचे कारण आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेणे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.लोकप्रतिनिधी व पोलीस अधिका-यांकडून पाहणीआमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, माजी आमदार किशनचंद तनवाणी, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एसीपी डॉॅ. नागनाथ कोडे, निरीक्षक इंदलसिंग बहुरे, उपनिरीक्षक बाबासाहेब आहेर, काशीनाथ महांडुळे आणि कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली.अग्निशमनचे सहा बंब आणिपाण्याचे सहा टँकरआगीची माहिती कळताच मनपा अग्निशमन दलाचे तीन, शेंद्रा एमआयडीसीचा एक, व्हिडिओकॉन कंपनीचा एक आणि गरवारे कंपनीचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. शिवाय पाण्याच्या सहा टँकरची मदत झाली. एमजीएम आणि हेगडेवार रुग्णालयातील अग्निशमन अधिकारी आणि कर्मचायांनीही आग तेथे धाव घेतली.

टॅग्स :fireआगhospitalहॉस्पिटलAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस