शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

‘टोकाई’ सुरू होण्याची आशा पल्लवीत

By admin | Updated: May 9, 2014 00:22 IST

इब्राहिम जहागीरदार, कुरूंदा अनेक वर्षापासून या ना त्या कारणाने रखडलेल्या कुरूंदा येथील नियोजीत टोकाई सहकारी साखर कारखान्याचे ९० टक्के काम मार्गी लागले.

इब्राहिम जहागीरदार, कुरूंदा अनेक वर्षापासून या ना त्या कारणाने रखडलेल्या कुरूंदा येथील नियोजीत टोकाई सहकारी साखर कारखान्याचे ९० टक्के काम मार्गी लागले. हत्ती निघाला पण शेपूट अडकल्याने गळीत हंगामावर प्रश्न चिन्ह लागलेले असताना आ. जयप्रकाश दांडेगावकर यांनी ‘टोकाई’चा गळीत हंगाम पुर्णा कारखान्याच्या सहकार्यातून करण्याचा विडा उचलला होता. गेल्या बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत कारखान्याला संजीवनी देण्यासाठी ‘टोकाई’साठी ५ कोटी ६६ लाख रुपये मंजूर झाल्याने हा कारखाना सुरू होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील टोकाई साखर कारखाना या भागासाठी महत्वाचा मानला जातो. कारखान्याच्या सुरूवातीपासून तर पायाभरणीपर्यंत अनेक अडथळे आले होते. आतापर्यंत कारखान्याच्या उभारणीसाठी मोठेच राजकारण घडले. प्रत्येक निवडणुकीत कारखान्याचा मुद्दा उपस्थितीत केला जात होता. निधीअभावी कारखान्याचे काम नेहमी रखडत गेले. आजघडीलाही काम खोळंबलेले आहे. या कारखान्याच्या पायाभरणीपासून चिमणी उभारण्यापर्यंत तत्कालीन दोन मुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभलेली असताना कारखाना सुरू होण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत; परंतु कारखान्याच्या निवडणुकीनंतर दिग्गज नेत्यांची फळी संचालकपदावर आल्यानंतर खर्‍या अर्थाने कामाला गती मिळाली. त्यामुळेच कारखान्याचे ९० टक्के काम मार्गी लागले आहे. कारखान्याची मशिनरी, गाळ जमविण्याचे बांधकाम, चिमणी आदी महत्वाची कामे झाली आहेत. जवळपास १० टक्के काम रखडले आहे. या कारखान्यावर काँग्रेस व राष्टÑवादीच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राकाँकडे ठेवण्यात आले आहे. कारखान्याच्या कामाला आतापर्यंत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आ. जयप्रकाश दांडेगावकर, आ. राजीव सातव, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सहकार्य लाभलेले आहे. वसमत व कळमनुरी तालुक्यातील गावे मोठ्या प्रमाणात ‘टोकाई’च्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे कुरूंदा, आंबा चौंढी, गिरगाव, कौठा व कळमनुरी तालुक्यासाठी हा कारखाना लाभदायक ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत आ. दांडेगावकर यांनी पुर्णा कारखान्याच्या माध्यमातून पुढील गळीत हंगाम करण्याचे ठोस आश्वासन दिले होते. त्यामुळे कारखाना ‘पुर्णा’च्या घशात जातो की काय? अशी चर्चाही दबक्या आवाजात होत होती. दांडेगावकर यांच्या ताब्यात कारखाना गेल्यास कारखान्याला संजीवनी मिळेल, असा कयास लावण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर वेगळ्या घडामोडी घडण्याअगोदर राज्य सरकारच्या वतीने बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत ‘टोकाई’ची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ५ कोटी ६६ लाख रुपयांचे भागभांडवल देण्याचा निर्णय घेण्यात आला. कारखान्याचे ९० टक्के काम पूर्ण वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे जवळपास दहा वर्षापूर्वी टोकाई कारखान्याच्या उभारणीला सुरूवात झाली कारखान्यातील विविध साहित्य लंपास झाले आहे. त्यानंतरही याठिकाणी सुरक्षा ठेवण्यात आलेली नाही कुरूंदा परिसरासाठी महत्वाचा असलेला टोकाई कारखाना सुरू होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साह आहे वसमतचे आ.दांडेगावकर यांनी ‘पुर्णा’च्या माध्यमातून या कारखान्याचा गळीत हंगाम करण्याचे आश्वासन दिले आहे टोकाई कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता राज्य सरकारकडून ५ कोटी ६६ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे