शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरची लेक बॅ. अर्चना मेढेकर कॅनडात न्यायमूर्ती, महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 19:37 IST

छत्रपती संभाजीनगरचे माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज ते कॅनडाचे न्यायालय; बॅ. अर्चना मेढेकरांचा थक्क करणारा प्रवास.

छत्रपती संभाजीनगर: जगाच्या पाठीवर मराठी माणसाने आपल्या कर्तृत्वाने अनेक शिखरे सर केली आहेत. यात आता छत्रपती संभाजीनगरच्या आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. शहरातील माणिकचंद पहाडे लॉ कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या बॅ. अर्चना अरुण मेढेकर यांची कॅनडातील ओंटारियो प्रांतात (फोर्ट फ्रान्सिस/केनोरा) न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे.

शिक्षण छत्रपती संभाजीनगरमध्ये, सराव कॅनडातन्यायमूर्ती अर्चना मेढेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध माणिकचंद पहाडे लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी यॉर्क विद्यापीठाच्या ओसगुड हॉल लॉ स्कूलमधून कायद्यात पदव्युत्तर पदवी (LLM) संपादन केली. २००४ मध्ये त्यांनी ओंटारियो बारमध्ये प्रवेश मिळवला आणि कुटुंब, कॉर्पोरेट व इमिग्रेशन कायद्यात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. २००८ मध्ये त्यांनी स्वतःची लॉ फर्म स्थापन केली.

सामाजिक बांधिलकी आणि दांडगा अनुभव न्यायमूर्ती मेढेकर यांनी केवळ वकिलीच केली नाही, तर ३५० हून अधिक तरुण क्लायंटचे प्रतिनिधित्व करत त्यांना न्याय मिळवून दिला. 'मुलांचे वकील कार्यालय' (OCL) आणि 'संयुक्त राष्ट्रांच्या मेडिएटर्स बियॉन्ड बॉर्डर्स' यांसारख्या संस्थांसोबत त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत कॅनडा सरकारने त्यांना 'टॉप २५ कॅनेडियन इमिग्रंट्स' पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.

 

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान त्या केवळ एक कायदेतज्ज्ञ नसून यॉर्क विद्यापीठ आणि ग्वेल्फ-हंबर विद्यापीठात त्या अध्यापनाचे कार्यही करतात. कायद्याच्या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख संपूर्ण कॅनडात आहे. कॅनडाच्या मुख्य न्यायाधीश शेरोन निकलस यांनी त्यांची नियुक्ती केल्यामुळे, आता त्या फोर्ट फ्रान्सिस आणि केनोरा येथील न्यायालयात न्यायदानाचे कार्य करतील. एका मराठमोळ्या महिलेने परदेशातील न्यायव्यवस्थेत इतके मानाचे स्थान मिळवणे, ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब ठरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar's Archna Medhekar Appointed Judge in Canada: Pride!

Web Summary : Archna Medhekar, a law graduate from Chhatrapati Sambhajinagar, has been appointed as a judge in Ontario, Canada. Her extensive legal experience, social commitment, and recognition as a top Canadian immigrant led to this prestigious position. She will serve in Fort Frances and Kenora courts.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCourtन्यायालय