औरंगाबाद : ‘सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा’, ‘टिक टिक वाजते डोक्यात’ यासारख्या जुन्या- नव्या हिंदी, मराठी गाण्यांवर जैन समाजील महिलांनी ठेका धरला. निमित्त होते जैनम महिला मंचतर्फे आयोजित ‘सुहाने रिश्ते’ या कार्यक्रमाचे. कार्यक्रमात महिलांनी मनसोक्त आनंद लुटला. यात सारेगमप लिटिल चॅम्पची वर्षा भावे, तसेच घे भरारी कार्यक्रमाची पूर्वी भावे यांच्यासह एकूण १५ जणांच्या संघाने मराठी, हिंदी गाणी सादर करून धम्माल उडवून दिली. यावेळी जैनम महिला मंचच्या माजी अध्यक्ष भारती बागरेचा, कविता अजमेरा, डॉ. निर्मला मुथा, करुणा सावजी, मंगला पारख, रूपाली कुंकुलोळ, रत्नमाला देसरडा, कमला ओस्तवाल यांच्यासह मेघा सुंगधी, पद्मा साहुजी, सुषमा साहुजी, नंदा मुथा, मंगल गोसावी आदींची उपस्थिती होती.‘ओ पालन हरे...’ , ‘फुलों का तारों का, सबका कहना है’ अशी बहारदार गाणी सादर करण्यात आली. ‘जब प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याचे बोल ऐकताच महिलांनी टाळ्या वाजवीत ठेका धरला. त्यानंतर कथ्थक नृत्य करणाऱ्या दिशा देसाईने ‘दिल है छोटासा, छोटीसी आशा’ या गाण्यावर अतिशय भावपूर्ण नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ‘चप्पा चप्पा चरखा चले’ या गाण्याचे बोल ऐकताच प्रेक्षकांमधील महिलांनी जागीच नृत्य करण्यास सुरुवातकेली. याचबरोबर कार्यक्रमात ‘पतंग उडवीत होते गं बाई, मी पतंग उडवीत होते’ यासारख्या एकापेक्षा एक सरस सहा लावण्यांचे सादरीकरण क रण्यात आले.काहींनी विनोदी उखाणे घेऊनही मनोरंजन केले. पद्मा साहुजी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर गायनाच्या कार्यक्रमाचे पूर्वी भावे हिने सूत्रसंचालन केले.
‘सुहाने रिश्ते’ कार्यक्रम रंगला
By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST