शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

सव्वा लाखाच्या बिलासाठी मृतदेह धरला रोखून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 09:19 IST

सव्वा लाखाचे बिल भरण्यावरून कोविड रुग्णाचा मृतदेह सुमारे साडेपाच तास रोखून ठेवल्याची खळबळजनक घटना सोमवारी बजाजनगरातील ममता हॉस्पिटलमध्ये घडली.

औरंगाबाद : सव्वा लाखाचे बिल भरण्यावरून कोविड रुग्णाचा मृतदेह सुमारे साडेपाच तास रोखून ठेवल्याची खळबळजनक घटना सोमवारी बजाजनगरातील ममता हॉस्पिटलमध्ये घडली. सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. सिडको वाळूज महानगरातील एका ४९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना ३ मे रोजी बजाजनगरातील ममता मेमोरियल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. त्यावेळी नातेवाईकांकडून तत्काळ १ लाख रुपये अनामत रक्कम घेण्यात आली होती. याशिवाय, दररोज औषधांच्या खर्चापोटी जवळपास अडीच ते तीन लाख रुपये रुग्णाच्या नातेवाईकांकडून वसूल करण्यात आले. दरम्यान, सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तुमच्या रुग्णाचे निधन झाले असून उपचाराचे १ लाख १९ हजार रुपये भरा, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. उर्वरित बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने मृताच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांकडे विनवण्या करून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताब्यात देण्याची विनंती केली. मात्र, रुग्णालयाचे बिल भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही, असा पवित्रा या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी घेतला.  डॉक्टरांनी केले हात वरबिलासाठी मृतदेह रोखून धरल्याची माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मिळाल्यानंतर ममता हॉस्पिटलचे डॉ. सुदाम चव्हाण यांनी बिलासाठी मृतदेह रोखून धरला नसल्याची सारवासारव केली.  

पोलिसांची मध्यस्थी या प्रकाराची माहिती मिळताच वडगाव-बजाजनगरचे सरपंच सचिन गरड, भगवान ढेरंगे, भाऊसाहेब पवार, उपनिरीक्षक प्रीती फड, पोलीस हेडकाॅन्स्टेबप रामदास गाडेकर आदींनी मृताचे नातेवाईक व डॉक्टरांशी चर्चा केली. नातेवाईक आक्रमक झाल्याने व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही हजर झाल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद