शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्हीबाधित बालक वसतिगृहाविना

By admin | Updated: January 13, 2016 23:58 IST

हिंगोली : एचआयव्ही संसर्गित जिल्ह्यामध्ये ० ते १४ वयोगटातील जवळपास १३२ बालके आहेत. त्यापैकी अनेकांना आईवडील नसल्याने त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हिंगोली : एचआयव्ही संसर्गित जिल्ह्यामध्ये ० ते १४ वयोगटातील जवळपास १३२ बालके आहेत. त्यापैकी अनेकांना आईवडील नसल्याने त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही बालके नातेवाईकांकडे राहतात. त्यांची हेळसांड होणार नाही, याची काळजी घेत शासनाकडून त्यांना हक्काचे वसतिगृह असणे आवश्यक आहे.जिल्हा आरोग्य विभागामार्फत एचआयव्हीचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरी व ग्राम स्तरावर विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जात आहेत. बाधितांना आवश्यक उपचार पद्धती दिली जात आहे. गतवर्षी जिल्ह्याचे बाधितांचे प्रमाण १.८ टक्के एवढे होते. जनजागृतीनंतर यावर्षी ते ०.७१ टक्के झाले आहे. असे असले तरी एचआयव्ही संसर्गित अनाथ बालकांसाठी वसतिगृह आवश्यक आहे. जेणेकरून त्यांची हेळसांड होणार नाही, परंतु याबाबत शासनाकडून काही हालचाली होताना दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांना हक्काचे वसतिगृह नसल्याने ते इतर नातेवाईकांकडे राहतात. आजही समाजामध्ये काही ठिकाणी संसर्गित बालके आणि सामान्य बालकांत भेदभाव केला जातो. तो करू नये, यासाठी होणारी जागृती मानसिक कसोटीवर टिकत नाही. त्यामुळे त्यांना पर्यायी व्यवस्था असल्यास ते फायद्याचे ठरू शकते. जिल्ह्यात एकूण ७१ अनाथ संसर्गित मुले आहेत. त्यापैकी अनेक पूर्णत: अनाथ आहेत. त्यामुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एचआयव्हीबाबत तसेच बाधित व्यक्तींना माहिती व समुपदेशन करण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण ७ आयसीटीसी केंद्र आहेत. तसेच उपजिल्हा रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातून मोफत उपचार व मार्गदर्शन केले जाते. (प्रतिनिधी)