शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू जन गर्जना मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारली; संयोजक मोर्चा काढण्यावर ठाम

By बापू सोळुंके | Updated: March 18, 2023 23:37 IST

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ही परवानगी नाकारण्यात आल्याचे कारण पोलिसांकडून सांगण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर: सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्यावतीने उद्या रविवारी आयोजित केलेला समर्थन मोर्चाला पोलीस प्रशासनाने रविवारी रात्री परवानगी नाकारली. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी हा मोर्चा होणार असल्याचे संयोजकांनी लोकमतला सांगितले.

औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या महिन्यात घेतला. या निर्णयाचा हिंदू समाजाच्या वतीने केंद्र सरकारचा अभिनंदन करण्यासाठी तसेच छत्रपती संभाजी नगरच्या समर्थनार्थ उद्या रविवारी सकल हिंदू एकत्रित समितीच्यावतीने क्रांती चौक इथून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . क्रांती चौक ते पैठण गेट, टिळकपथ मार्गे औरंगपुऱ्यातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. 

या मोर्चासाठी परवानगी मिळावी संयोजकांनी 16 मार्च रोजी पोलीस प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला  होता. शनिवारी  सायंकाळी  पोलीस प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याची पत्र आयोजकांना दिले. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ही परवानगी नाकारण्यात आल्याचे कारण पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस प्रशासनाने  मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी ठरल्याप्रमाणे मोर्चा काढला जाणार असल्याचे आयोजकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सरकारचे अभिनंदन करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्नच नसल्याचे मोर्चाच्या संयोजकांनी स्पष्ट केले

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस