शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

खाजगी कंपन्या लावताहेत हायस्पीड इंटरनेटचे व्यसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:27 AM

खाजगी मोबाइल कंपन्या ग्राहकांना हायस्पीड इंटरनेटची एकप्रकारे सवय लावत आहेत. आता फुकटात दिले जात आहे. यातून ज्यांना स्मार्ट फोन, हायस्पीड इंटरनेट परवडणारे नाही, त्यांना एकप्रकारे व्यसनच लावले जात आहे. एकदा का हे व्यसन लागले की, मग दर वाढविले जातील आणि ग्राहकांना ते घ्यावेच लागेल, असे परखड मत ‘बीएसएनएल’चे प्रधान महाव्यवस्थापक अरविंद वडनेरकर यांनी ‘लोकमत’च्या कॉफी टेबल उपक्रमात व्यक्त केले.

औरंगाबाद : खाजगी मोबाइल कंपन्या ग्राहकांना हायस्पीड इंटरनेटची एकप्रकारे सवय लावत आहेत. आता फुकटात दिले जात आहे. यातून ज्यांना स्मार्ट फोन, हायस्पीड इंटरनेट परवडणारे नाही, त्यांना एकप्रकारे व्यसनच लावले जात आहे. एकदा का हे व्यसन लागले की, मग दर वाढविले जातील आणि ग्राहकांना ते घ्यावेच लागेल, असे परखड मत ‘बीएसएनएल’चे प्रधान महाव्यवस्थापक अरविंद वडनेरकर यांनी ‘लोकमत’च्या कॉफी टेबल उपक्रमात व्यक्त केले.अरविंद वडनेरकर यांनी संपादकीय विभागाशी ‘बीएसएनएल’ची वाटचाल, भविष्यातील नियोजन आदींविषयी संवाद साधला. आज लॅण्डलाइन कमी होत आहे,बाब ही खरी आहे; परंतु लॅण्डलाइनमध्ये ‘बीएसएनएल’ आजही क्रमांक एकवर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात लॅण्डलाइनमध्ये ‘बीएसएनएल’चे ५७ ते ५८ टक्के प्रमाण (शेअर)आहे. स्पर्धेमुळे ‘बीएसएनएल’ आव्हानांना तोंड देत आहे. या स्पर्धेमध्ये ग्राहकांचाच विजय होत आहे. एकेकाळी महिनाभरासाठी एक जीबी डाटा मिळत होता. आता काही रुपयांत दररोज एक जीबी डाटा मिळत आहे,असे वडनेरकर म्हणाले. इतर कंपन्यांचे ४-जी आलेले आहे. ‘बीएसएनएल’चे ४-जी येण्यास काही अवधी आहे. परंतु ३-जी आणि ४-जीत फारसा फरक नाही. मार्च २०१८ पर्यंत औरंगाबाद शहरात ५० ते ६० ३-जी, तर संपूर्ण जिल्ह्यात २०० टॉवर बसविणार आहोत. काही वगळता सर्व टॉवर ३-जी होतील,असे अरविंद वडनेरकर यांनी सांगितले.आगामी पाच ते दहा वर्षांत अनेक कंपन्या बंद झालेल्या असतील. पाच वर्षांनंतर चार प्रमुख कंपन्यांच राहतील. त्यात निश्चित ‘बीएसएनएल’चा समावेश राहील. २०१६-१७ मध्ये महाराष्ट्र सर्कल ११२ कोटी रुपये फायद्यात आहे. औरंगाबाद जिल्हा १.८ कोटींनी फायद्यात आहे. आम्ही आधीच फायद्यात आहोत. केवळ यावर्षी दर कमी झाल्याने स्थिती वेगळी आहे. २०१९-२० मध्ये बीएसएनएल फायद्यात असेल,असे ते म्हणाले. अरविंद वडनेरकर म्हणाले,ग्राहक राहिले तर बीएसएनएल राहणार आहे. त्यासाठी ग्राहकांचा पाठिंबा आवश्यक आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण व ग्राहकांचा विश्वास ही आमची मजबूत बाब आहे.टॉवर सुरक्षीतबरेच नागरिक टॉवर काढायला सांगतात. त्यासाठी कॅन्सर, ट्युमर होण्याचे कारण सांगितले जाते. यामुळे आम्ही जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ), डिपार्टमेंट आॅफ टेलिकम्युनिकेशनला बोललो. तेव्हा काही आकडेवारी समोर आली. २००४ पासून तर २०१७ मध्ये मोबाइलची संख्या १०० पटींनी वाढली; परंतु २००४ मध्ये कॅन्सर, ट्युमरचे जेवढे रुग्ण होते, तेवढेच रुग्ण २०१७ मध्ये आहे. त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे मोबाइल टॉवरचा कॅन्सर, ट्युमर होण्याशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले. तरीही भविष्याचा विचार करून जागतिक आरोग्य संघटनेने सुरक्षेच्या दृष्टीने टॉवर आणि मोबाइलमध्ये रेडिएशनची मर्यादा निश्चित केलेली आहे. या मर्यादेचे उल्लंघन होत नाही,असेही अरविंद वडनेरकर म्हणाले.४४शब्दांकन : संतोष हिरेमठशहरात धूळ अन् बिघडलेली वाहतूकमी पुण्याहून औरंगाबादला आलो. अत्यंत चांगले शहर असून केवळ रस्त्यावर, रस्त्याच्या बाजूला खूप धूळ आहे. यावर थोडी गुंतवणूक करून महापालिकेने रस्त्याच्या बाजूला लॉन बसविले पाहिजे. वाहतूक बिघडलेली आहे. ट्रिपल सिट, राँगसाइड वाहने चालविले जातात. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यात बदल झाला तर शहर आणखी चांगले होईल,असे मतही अरविंद वडनेरकर यांनी व्यक्त केले.अतिविशेष संचार सेवा पदक प्राप्तउत्तर प्रदेशातील झाशीमध्ये अरविंद वडनेरकर यांचा जन्म झाला. झाशीमध्ये महाराष्ट्रीयन लोक खूप आहेत. १२ वीपर्यंत तेथेच शिक्षण झाले. त्यानंतर भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीला (एनआयटी), रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशनमध्ये बीटेक झाले. त्यानंतर यूपीएससीची परीक्षा पास झाले. इंडियन टेलिकॉम सर्व्हिस (आयटीएस) मिळाले. १९८९ मध्ये डिपार्टमेंट आॅफ टेलिकम्युनिकेशनमध्ये सहायक विभागीय अभियंता म्हणून रुजू झाले. त्यानंतर विभागीय अभियंता, उपमहाव्यवस्थापक, सहमहाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक असा सगळा प्रवास झाला. २००४ मध्ये संपूर्ण ‘बीएसएनएल’मध्ये उत्कृष्ट कर्मचारी म्हणून अतिविशेष संचार सेवा पदक त्यांना प्राप्त झालेले आहे. सिल्वर मेडल आणि एक लाख रुपये असे या पारितोषिकाचे स्वरूप होते.