शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरू चोपडे यांची होणार उच्चस्तरीय चौकशी; उच्च शिक्षणमंत्री तावडे यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 15:27 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कामकाजासंदर्भात अनेक संघटना, व्यक्ती यांनी राज्यपाल तथा कुलपती यांच्याकडे तसेच शासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कामकाजासंदर्भात अनेक संघटना, व्यक्ती यांनी राज्यपाल तथा कुलपती यांच्याकडे तसेच शासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील  यांची चौकशी समिती नेमण्याची घोषणा उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत केली. या चौकशीचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे.

विद्यापीठात शासकीय कामकाज विद्यापीठ कायद्यानुसार होत नसल्याच्या अनेक तक्रारी राज्यपाल तथा कुलपती  यांच्याकडे विविध संघटना, संस्था आणि व्यक्तींनी केल्या होत्या. याचवेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण यांच्या शिष्टमंडळानेही राज्यपाल सी.  विद्यासागर राव यांची भेट घेत कुलगुरूंनी केलेल्या अनियमिततेविषी निवेदन दिले होते. यानंतर आ. चव्हाण यांनी विधानपरिषदेत नियम २६० अन्वये झालेल्या चर्चेत विद्यापीठाचा कारभार आणि कुलगुरूंच्या आर्थिक भ्रष्टाचारांची मुद्देसुद मांडणी केली होती.

या चर्चेला विनोद तावडे यांनी बुधवारी उत्तर दिले. यात त्यांनी राज्यपालाच्या आदेशाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची चौकशी करण्यासाठी माजी कुलगुरू डॉ. एस. एफ़ पाटील यांची चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. यात डॉ. इतरही शासकीय अधिकाºयाचा समावेश करणार असल्याचेही  तावडे यांनी स्पष्ट केले. ही समिती दोन महिन्यात वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्यपालांना सादर करेल, असेही तावडे यांनी सांगितले. विधानपरिषदेत तावडे यांनी घोषणा केल्यानंतर तात्काळ याविषयीचा शासन निर्णयही काढण्यात आला आहे. या शासन निर्णयात विविध समितीच्या कामकाजाविषयी स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादVinod Tawdeविनोद तावडेuniversityविद्यापीठ