शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

हायप्रोफाईल सेक्स रॅकेट : वेश्याव्यवसाय करणाऱ्या २२ दलालांची नावे उघडकीस

By राम शिनगारे | Updated: January 23, 2024 22:19 IST

मुख्य आरोपीच्या बँक खात्यातील २८ लाख रु. गोठवले

छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये मोठी घडामोड घडली आहे. कुख्यात आरोपीने वेश्याव्यवसायातून कमावलेले बँक खात्यातील २८ लाख २३ हजार ५८३ रुपये गोठवत दोन वाहनेही जप्त केली आहेत. दुसऱ्या छाप्यातील पाच आरोपींना न्यायालयाने तिसऱ्यांदा २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली. त्याच वेळी वेश्याव्यवसायात अडकलेल्या शहरातील २२ दलालांची नावेही पोलिसांना चौकशीत मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकाने १३ जानेवारी रोजी एन-७ येथील कुंटणखान्याचा पर्दाफाश केला होता. त्यात मुख्य आरोपी संदीप पवार याच्यासह जागेच्या मालकाला अटक केली. तर एका महिलेला नोटिसीवर सोडले होते. त्यातील जागेच्या मालकाला न्यायालयाने जामीन मंजूर केला. मुख्य आरोपी संदीप पवारला पोलिस कोठडी मिळाली. पवार याने कोठडीत दिलेल्या माहितीनुसार पोलिस उपायुक्त नवनीत कॉवत यांच्या नेतृत्वात सिडको पोलिसांनी १६ जानेवारीला बीड बायपासवरील सेनानगरात छापा मारून पोलिसांनी कुख्यात तुषार राजपूत, प्रवीण कुरकुटे, गोपाल लक्ष्मीनारायण वैष्णव, लोकेशकुमार केशमातो, अर्जुन भुवनेश्वर दांगे (दोघे रा. झारखंड) या पाच जणांना अटक केली.

त्यांच्या चौकशीतून पुण्याची कुख्यात दलाल लेडी डॉन कल्याणी देशपांडे हिचे नाव समोर आल्यावर २० जानेवारीला तिला अटक केली. ती ३० जानेवारीपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहे. दरम्यान, कुख्यात तुषार राजपूत याने पोलिसांची नजर चुकवून काही बँकेतील धनादेशांवर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास अधिकारी गीता बागवडे यांनी उपायुक्त नवनीत कॉवत यांच्या सूचनेनुसार राजपूतच्या दोन बँकांतील खात्यांची चौकशी करून रक्कम गोठवली. आरोपींना न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली.पोलिस आणखी खोलात जाणार

सिडको पोलिसांनी वेश्याव्यवसायात नव्याने गुंतलेल्या संदीप पवारला अटक केली. त्यापासून पुण्यातील लेडी डॉन कल्याणीपर्यंत पोलिसांनी रॅकेट उघडकीस आणले आहे. त्यात पहिल्यांदाच बँक खातीही गोठवली. सिडको पोलिस आणखी खोलात जाऊन तपास करीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद