शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

पीएच.डी. पूर्ण करेपर्यंत भारतात राहू द्या; येमेनच्या विद्यार्थ्याची विनंती याचिका हायकोर्टाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:37 IST

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली; याचिकाकर्त्याला सहकुटुंब त्याच्या मायदेशी जावे लागणार

छत्रपती संभाजीनगर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अरेबियन येमेन देशातील रहिवासी सालाह सालेह अहमद ओबादी यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली आहे. परिणामी फॉरेन रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसने याचिकाकर्त्याला सहकुटुंब त्याच्या मायदेशी परत पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

भारतातील वास्तव्याची मुदत संपल्यामुळे याचिकाकर्त्याने १ जुलै २०२५ पर्यंत मायदेशी परत जाण्याबाबत संबंधित कार्यालयाने त्याला पाठविलेले ‘एक्झिट परमिट’ रद्द करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातूनच पीएच.डी. अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत भारतात राहू देण्याची त्याची विनंती होती.

याचिकाकर्त्याची पार्श्वभूमीयाचिकाकर्ता ‘स्टुडन्ट्स व्हिसा’वर २०१७ ला भारतामध्ये आला होता. २०२० ला त्याने विद्यापीठातून एमए इंग्रजी पदवी घेतली. २०२१ ला नोंदणी करून त्याने ‘पीएच.डी. इंग्लिश’साठी प्रवेश घेतला. विद्यापीठात या विषयाचे ३० ‘गाईड’ आहेत. त्यापैकी आर. आर. सी. कमिटीने डॉ. शेख परवेज असलम यांना गाईड म्हणून याचिकाकर्त्याला उपलब्ध करून दिले. दोन-तीन वर्षे गाईड व याचिकाकर्त्यांचे संबंध चांगले होते. मात्र, काही कारणाने संबंध बिघडल्यामुळे डॉ. शेख यांनी गाईड म्हणून मार्गदर्शन करण्यास नकार दिला. याचिकाकर्त्याला दुसरा गाईड नेमण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले.

दुसऱ्या घटनेत परदेशी विद्यार्थी साहाय्य कक्षाच्या संचालिका सुचेता यांबल यांनादेखील मानसिक त्रास दिला व असभ्य भाषा वापरली म्हणून त्यांनी संचालक पदाचा राजीनामाही दिला होता. तिसऱ्या घटनेमध्ये धाराशिव येथील डॉक्टर गोविंद कोकणे यांनी गाईड म्हणून याचिकाकर्त्याला मार्गदर्शन करण्यासाठी संमती दर्शविल्याचे विद्यापीठाला सांगितले. मात्र, याबाबत विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या माहितीनुसार याचिकाकर्त्याने डॉ. कोकणे यांना अंधारात ठेवून, त्यांची दिशाभूल केली. त्यांनी उच्च न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून याचिकाकर्त्याला दिलेली संमती मागे घेतली. वरील सर्व घटनांवरून उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. विद्यापीठातर्फे ॲड. संभाजी टोपे, याचिकाकर्त्यातर्फे ॲड. आय. डी. मनीयार आणि एफआरआरओ कार्यालयातर्फे ॲड. सुरेश मुंडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ