शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

वारसा ऐतिहासिक पण पाण्याची बोंबाबोंब; निपट निरंजन कॉलनीसह १८ वसाहतींची टँकरवरच मदार

By साहेबराव हिवराळे | Updated: April 2, 2024 18:57 IST

न्यू पहाडसिंगपुरा, निपट निरंजन कॉलनी, पार्वतीनगरासह इतर १६ वसाहतींची टँकरवरच मदार एक दिवस एक वसाहत

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक वारसास्थळे जवळ असलेल्या न्यू पहाडसिंगपुरा, निपट निरंजन कॉलनी, नर्सेस कॉलनी, खुशबू कॉलनी, पार्वतीनगरसह इतर १६ वसाहतींची तहान टँकरवरच भागते. या परिसरात शैक्षणिक संस्थाही आहेत. परिसरातील रहिवाशांना सोयीच्यावेळी पुरेसा पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. कचरा सफाई करणारे या भागातील विविध कॉलन्यांत फिरकतदेखील नाहीत. घंटागाडी येते; पण ती घरापर्यंत नव्हे तर कॉर्नरवरूनच माघारी जाते. मग कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ड्युटीवर जाताना हातात कचरा घेऊन घंटागाडीमागे फिरावे लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे टँकर घ्यावेच लागतेपाण्याचे दुर्भिक्ष्य न्यू पहाडसिंगपुरा, पार्वतीनगरसह इतर १६ वसाहतींना आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेची टाकी बांधली. मात्र, पुरेशा पाण्यासाठी प्रतीक्षाच असून, सध्या तरी जार आणि टँकरवरच मदार ठेवावी लागत आहे.- ॲड. हेमलता वाघमारे (रहिवासी)

कचरा गाडी आठवड्यालाकाही निवडक वसाहतीत घंटागाडी फक्त चौक व कॉर्नरवरून येऊन निघून जाते. तिचा पाठलाग करावा लागते. हातात कचरा घेऊन तिचा शोध घेण्याची वेळ अनेकदा परिसरातील महिला व नागरिकांवर येते.- दीपक जाधव (रहिवासी)

अतिक्रमणाकडे मनपाचे दुर्लक्षखेळाचे मैदान अतिक्रमणांत हरवले असून, कॉलनीत जातानाही वाहने चालविताना अत्यंत दक्षपणे ये-जा करावी लागते.- प्रमोद सावंत

ड्रेनेजलाईनला योग्य उतार हवाकचरा सफाई होत नसल्याने रस्त्याच्या बाजूला अघोषित कचरा डेपो तयार होतो. परिसराचे भौगोलिक क्षेत्र चढउताराचे असल्याने मलनिस्सारण वाहिनीची समतल पातळी असणे गरजेचे आहे. मग ड्रेनेज चोकअपच्या तक्रारी कमी होतील.- संतोष भिंगारे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका