शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

हॅलो, हॅलो...माझे नाव मतदार यादीत आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 20:26 IST

तक्रार नोंदविण्यासाठी आयोगाने उपलब्ध केला ‘टोल फ्री क्रमांक १९५०’ 

औरंगाबाद : निवडणूक आयोगाने तक्रारी नोंदविता याव्यात, यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावरून सध्या एकच प्रश्न विचारला जातो आहे, तो म्हणजे हॅलो...सर माझे नाव मतदार यादीमध्ये आहे ना. नाव असल्याचे समजल्यानंतरच समोरील व्यक्ती फोनवरील संभाषण बंद करीत असल्याचा अनुभव निवडणूक विभागाला येत आहे. 

अजून आचारसंहितेचा पारा चढला नसल्यामुळे मागील दीड महिन्यात निवडणूक आणि मतदानासंबंधी एकही तक्रार आली नसून  वैयक्तिक माहिती विचारण्यासाठी या टोल फ्री क्रमांकाचा वापर होत आहे. मतदार यादीत नाव असण्याबाबतचा प्रश्न सर्वाधिक वेळा विचारला गेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या तक्रारींसाठी २५ जानेवारीपासून १९५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यासाठी एक पथक गठीत करण्यात आले आहे. कोणाचे नाव यादीत आले आहे की नाही, अर्जात काय उणिवा राहिल्या आहेत, मतदार यादीत नाव नोंदणीसाठी काय करावे लागेल, कोठे अर्ज भरावा लागेल, अर्जासोबत काय कागदपत्रे जोडावी लागतील. हे आयोगाने वेळोवेळी जाहीर केले असले तरी टोल फ्री क्रमांक दिला. आजवर त्या क्रमांकावर १२४८ कॉल्स आल्याची नोंद झाली आहे.

रोज ४० ते ४५ कॉल्स फोन करणारे स्वत:चे नाव मतदार यादीमध्ये आहे का, कोणत्या मतदारसंघातील यादीमध्ये आहे. नावात बदल करायचा असल्यास काय करावे लागेल, आता नाव नोंदले तर यावेळी मला मतदान करता येईल का, अशाच प्रकारच्या प्रश्नांचा भडिमार मतदारांकडून केला जात आहे. रोज ४० ते ४५ कॉल्स प्राप्त होत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

व्हीव्हीपॅटचा डेमो २१ कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाजिल्ह्यातील एक हजारांवर अधिकारी, कर्मचारी आणि कामगार असलेल्या २१ कंपन्यांमध्ये निवडणूक विभाग व्होटर व्हेरिफीयेबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) या मशीनचा डेमो देणार आहे. गुरुवारपासून या तीनदिवसीय मोहिमेस सुरुवात झाली. ४जिल्ह्यात २ लाख ५० हजारांवर नागरिकांनी व्हीव्हीपॅटच्या डेमोमध्ये सहभाग घेतला. यापैकी १ लाख ८० हजार जणांनी प्रत्यक्ष मतदानाचा डेमो करून बघितला. जिल्ह्यातील एक हजारांवर कर्मचारी असलेल्या २१ कंपन्यांतून अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना व्हीव्हीपॅट मशीनचा डेमो दिला जाणार आहे. यासाठी विशेष पथकांचीही नेमणूक केली आहे. ४शनिवारी या तीनदिवसीय मोहिमेचा समारोप केला जाईल. कंपन्यांतून कामगारांपर्यंत पोहोचणे आणि मतदानाबद्दल जागृती करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. २१ कंपन्यांतील कर्मचारी, कामगारांना प्रशिक्षण, डेमो देण्याबरोबरच मतदानाची शपथही दिली जाणार आहे. मतदान करण्यासंंबंधीचे संकल्प पत्रही भरवून घेतले जाणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAurangabadऔरंगाबाद