शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

हेडगेवार रुग्णालयात मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे संघाने घेतले बौद्धिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:19 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संचलित डॉ. हेडगेवार रुग्णालयातील दामूअण्णा सभागृहात रविवारी देवगिरी प्रांत समन्वय बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक ...

ठळक मुद्देगुप्तरीत्या खल : निवडणुकीच्या वातावरणात दुष्काळ अजेंड्यावर, प्रदेश कार्यकारिणी बैठकीपूर्वी संघ परिवाराच्या कामाचा आढावा

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संचलित डॉ. हेडगेवार रुग्णालयातील दामूअण्णा सभागृहात रविवारी देवगिरी प्रांत समन्वय बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्यांचे बौद्धिक घेतले. जालन्यात सोमवारी होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी संघ परिवाराचे पूर्ण कामकाज भाजपच्या मंत्र्यांना रविवारी सांगण्यात आले. त्याआधारेच सोमवारच्या कार्यकारिणीत भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे बौद्धिक घेतले जाणे शक्य आहे. शिवसेनेशी युती होवो अथवा न होवो संघ परिवाराच्या ताकदीवर ज्या जागा आहेत, त्या पुन्हा मिळविणे तसेच युती तुटल्यास अधिकच्या जागांसाठी मोर्चेबांधणी कशी करता येईल, याची चाचपणी प्रांत समन्वय बैठकीतून करण्यात आल्याचे भाजप गोटातून समजले.मुख्यमंत्र्यांसह मंत्री संघाच्या अशा बैठकींना आजवर वारंवार हजेरी लावत आले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात शिवसेनेसोबत भाजपची युती होणे धूसर होत चालल्याने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास संघासह परिवाराची भूमिका कशी असेल, हे जाणून घेण्यासाठीच मराठवाडा आणि खान्देश प्रांत समन्वय बैठकीला भाजप मंत्रिमंडळ आल्याची चर्चा सुरू झाली आहे. गाजावाजा न करता गुप्तरीत्या ही बैठक झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून, सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.निवडणुकीच्या वातावरणामुळे संघाच्या अजेंड्यावर दुष्काळ उपाययोजना असून, संघ परिवारातील उपसंघटना मराठवाडा आणि खान्देशात काय काम करीत आहेत, याचा बैठकनिमित्ताने आढावा घेण्यात आला. शेवटच्या सत्रात दुष्काळ उपाययोजना आणि संघ परिवार या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, कामगारमंत्री संभाजी निलंगेकर, देवगिरी प्रांत संघचालक दाजी जाधव, पश्चिम क्षेत्र संघचालक बाळासाहेब चौधरी यांच्यासह भाजप आमदारांची उपस्थिती होती.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दिवसभर प्रांत समन्वय बैठक घेण्यात आली. ही बैठक दरवर्षी घेण्यात येते. रा.स्व.सं व संघ परिवारांतर्गत येणाºया मजदूर संघ, किसान संघ, स्त्रीशक्ती, विद्यार्थी संघ, संस्कार भारती व इतर संघप्रणीत संघटना काय करीत आहेत, त्यांचे काम कसे चालले आहे, हे दिवसभराच्या विविध सत्रांत एकमेकांना समजून सांगण्यात आले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संघ व परिवार काय करू शकतो, टंचाई निर्मूलनाच्या उद्देशाने काम करण्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली. समन्वय बैठकीत राजकीय चर्चा होत नाही, असे ठामपणे सांगितले जात असले तरी आजच्या बैठकीत संघ परिवारातील संघटनांवर लोकसभा निवडणुकीत कोणती जबाबदारी देता येईल, याचा पूर्ण अंदाज भाजप मंत्र्यांनी बांधला.११ पैकी ६ जिल्हे भाजपकडेप्रांत समन्वय बैठकीत ११ जिल्ह्यांतील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, बीड, जालना, लातूर या जिल्ह्यांत भाजप खासदार आहेत. औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद या जिल्ह्यांसाठी व्यहूरचना करण्यासाठी काय मुद्दे हाताशी असावेत, यावर भाजपचा भर राहणार असल्याची चर्चा आहे. तसेच शिवसेनेवर युती करण्यासाठी एका प्रकारे दबाव आणण्यासाठी सदरील बैठकीला भाजप मंत्र्यांनी हजेरी लावल्याचे बोलले जात आहे.रुग्ण, नातेवाईकांचे बंदोबस्तामुळे हालहेडगेवार रुग्णालय परिसरात प्रांत समन्वय बैठकीला मुख्यमंत्र्यांसह मंत्री येणार असल्यामुळे पोलिसांनी गजानन महाराज मंदिर ते त्रिमूर्ती चौक बंदोबस्तासाठी ताब्यात घेतला होता. रुग्ण व नातेवाईकांची या बंदोबस्तामुळे तारांबळ झाली. रुग्णालयासमोरील किरकोळ चहा विक्रेत्यांसह इतर दुकानदारांवरही परिणाम झाला. रुग्णालय परिसरात बौद्धिक घेण्यामागे एकच उद्देश होता, तो म्हणजे प्रतिष्ठानने तेथे जागा उपलब्ध करून दिली, असे आयोजकांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा