शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर भुयारी मार्गात जड वाहनांच्या प्रवेशाने कोंडी; ३ पत्रानंतरही कमानीची उंची कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 19:43 IST

'राईट टर्न'चा तिढा आणि गायब झालेले साईनबोर्ड; शिवाजीनगर भुयारी मार्गातील गोंधळावर वाहतूक पोलिसांचे मोठे निरीक्षण.

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर भुयारी मार्गात रोज जड अवजड वाहनांचा बेकायदेशीर प्रवेशच वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरत आहे. ही बाब लक्षात घेऊन दोन्ही बाजूंच्या लोखंडी कमानीची उंची कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जागतिक बँक प्रकल्पाच्या अभियंत्यांना तीन वेळा पत्रे पाठविली. मात्र, अद्यापपर्यंत त्यांच्या या मागणीला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आता मनपाने पुढाकार घेतल्यानंतरही ही समस्या सुटेल का, असा प्रश्न नागरिकांसह वाहतूक पोलिसांना पडला आहे.

१५ फेब्रुवारी २०२५ रोजी भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. सोयीसाठी तयार करण्यात आलेला हा भुयारी मार्ग सोयीचा ठरण्याऐवजी उलट अडचणीचा ठरत असून, सातारा-देवळाईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात पाणी साचण्याबरोबरच रोज कार्यालयीन वेळेत येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. प्रामुख्याने सकाळी १० ते १ व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत नागरिकांना तासनतास कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी भुयारी मार्गात जड अवजड वाहनांचा प्रवेश बंद करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या लोखंडी कमानीची उंची कमी करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

‘राईट टर्न’ला लागतो वेळशिवाजीनगर व देवळाई चौकात वाहतूक नियोजनासाठी चार वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात असतात. जड अवजड वाहनांना बंदी घालून त्यांना शहानूरमियाँ दर्गा चौकातून वळवावी. जेणेकरून शिवाजीनगरकडून मुकुंदवाडीच्या दिशेने वळण घेणाऱ्या वाहनांना कमी वेळ लागून शिवाजीनगर भुयारी मार्गातील वाहतुकीचा भार कमी होईल, असे निरीक्षण वाहतूक पाेलिस अधिकाऱ्यांनी नोंदविले.

बंदीचे साइनबोर्ड नाहीतभुयारी मार्गात जड अवजड वाहनांना बंदी घालून दर्शनी भागात लोखंडी साइनबोर्ड लावणे आवश्यक असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले. बॅनरवरील सूचनाफलक असून, ते चालकांना स्पष्ट दिसत नाहीत. अनेकदा अवजड वाहने अडकल्यानंतर चाकातील हवा सोडून वाहन बाहेर काढावे लागते, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy vehicle entry jams Shivajinagar subway; height unchanged despite letters.

Web Summary : Illegal heavy vehicle entry causes daily traffic jams in Shivajinagar subway. Police requested height reduction of entry arches three times, but no action has been taken by the World Bank project engineers. Citizens question if the municipality's intervention will solve the problem.
टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर