शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

अपात्र ठरविण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेच्या तीन नगरसेवकांची सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 19:32 IST

या प्रकरणात तिन्ही नगरसेवकांवर त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठळक मुद्देदोन एमआयएमचे, तिसऱ्याची अगोदरच पक्षातून हकालपट्टीगोंधळी नगरसेवकाकडून सातत्याने व्यत्यय

औरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सुरक्षारक्षकांना मारहाण करणे, राजदंड पळविणे, महापौरांवर खुर्च्या भिरकावणाऱ्या तीन नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात यावे, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. 

बुधवारी या नगरसेवकांची सुनावणी नगरविकासमंत्री रणजित पाटील यांनी घेतली. पुढील सुनावणीपूर्वी महापालिकेला आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. महापालिकेने हिरवी झेंडी दाखविल्यास तिन्ही नगरसेवकांना अपात्र ठरविले जाईल. तिन्ही नगरसेवक एमआयएमचे आहेत. त्यातील एकाची मागील आठवड्यातच पक्षाने हकालपट्टी केली आहे.

१६ आॅक्टोबर २०१७ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावर जोरदार चर्चा सुरू होती. अचानक एमआयएमचे नगरसेवक अजीम अहेमद महापौरांच्या आसनासमोर आले. सुरक्षारक्षक बाजूला उभे होते. त्यांनी सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की करून ढकलून दिले. एमआयएमचेच सय्यद मतीन, शेख जफर यांनी चक्क राजदंड पळविला. गोंधळी नगरसेवक एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी प्लास्टिकच्या खुर्च्या चक्क महापौरांच्या अंगावर भिरकावल्या होत्या.

या प्रकरणात तिन्ही नगरसेवकांवर त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोषी नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी २५ आॅक्टोबर २०१७ रोजी राज्य शासनाकडे अहवालही पाठविण्यात आला होता. आता या प्रकरणाची पहिली सुनावणी बुधवारी मुंबईत घेण्यात आली. तिन्ही नगरसेवक सुनावणीस उपस्थित होते. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सुनावणी घेतली. पुढील सुनावणीस मनपाला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले. महापालिकेने तिघांना अपात्र ठरविण्यासाठी अहवाल दिल्यास शासनाकडून  अंतिम कारवाई होईल. सुनावणीप्रसंगी  उपायुक्त डी.पी. कुलकर्णी उपस्थित होते.

एमआयएमचे वेगळे प्रयत्ननगरसेवक सय्यद मतीन यांना अलीकडेच एमआयएम पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. त्यांना अपात्र ठरविण्यासाठीही पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाने फक्त मतीन यांच्यावर कारवाई केल्यास ते खंडपीठात धाव घेतील. शासनाला तिघांसंदर्भात निर्णय घ्यावा लागेल. तिघे अपात्र ठरल्यास एमआएम पक्षाला मोठा झटका बसणार आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन