शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील प्रादेशिक कोटा रद्द करणाऱ्या याचिकांवर २५ ला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 10:25 IST

महाराष्ट्र शासनाने ७ सप्टेंबर २०२० ला परिपत्रक काढून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील विभागानुसार ७०/३० कोटा आरक्षण रद्द केले.

ठळक मुद्देवैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील परिपत्रकास  आव्हानहा निर्णय घेण्यापूर्वी  विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही.

औरंगाबाद : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील विभागानुसार ७०/३० कोटा आरक्षण रद्द करणाऱ्या शासनाच्या परिपत्रकास आव्हान देणाऱ्या राज्यातील सर्व याचिकांवर २५ नोव्हेंबर रोजी  औरंगाबाद खंडपीठात एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. 

औरंगाबाद खंडपीठात ४ याचिका दाखल झाल्या आहेत. नागपूर खंडपीठाने सोमवारी (दि.९)  एक याचिका औरंगाबाद खंडपीठाकडे  हस्तांतरित  केली आहे. अशाच याचिका मुंबई मुख्य पीठात  दाखल झाल्या आहेत. या याचिकांमध्ये परस्पर विरोधी आदेश टाळले जावेत यासाठी ही एकत्रित सुनावणीची  व्यवस्था करण्यात आली आहे.  शासनाचे ७ सप्टेंबरचे  परिपत्रक रद्द करावे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ७०/३० विभागीय कोटा प्रमाणेच राबविण्यात  यावी  अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. शिवराज कडू पाटील, ॲड. अनिकेत चौधरी , ॲड.ए.जी . आंबेटकर  , ॲड. केतन  डी. पोटे  आणि ॲड. व्ही. आर. धोर्डे तर राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डि. आर. काळे काम पाहत आहेत .

पूर्वसूचना नाहीमहाराष्ट्र शासनाने ७ सप्टेंबर २०२० ला परिपत्रक काढून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील विभागानुसार ७०/३० कोटा आरक्षण रद्द केले. हा निर्णय घेण्यापूर्वी  विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही.  ७०/३० कोट्याप्रमाणे वैद्यकीय प्रवेश दिल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासाच्या ठिकाणापासून जवळच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्राधान्य दिले जाते. मागील ६ महिन्यांपासून कोरोना परिस्थितीमध्ये विद्यार्थी  गोंधळलेले आहेत. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी ७०/३० प्रमाणे परीक्षेची पूर्वतयारी केलेली होती. राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून घाईने हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाने २०१६  साली नागपूर खंडपीठामध्ये ७०/३० कोटा   प्रक्रियेचे समर्थन केले होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीMedicalवैद्यकीयAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ