नांदेड : जिल्ह्यात आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने सातत्याने प्रयत्न केले जातात़ आरोग्य विभागाच्या विविध योजनेत जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचे जि़ प़ चे आरोग्य सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांनी सांगितले़जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने गुरूवारी सुरक्षीत मातृत्व दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते़ यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ विजय कंदेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंग राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बी़ एम़ शिंदे, डॉ़ हंसराज वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती़ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ कंदेवाड यांनी जननी शिशू सुरक्षा योजना व जननी सुरक्षा योजनेतून माता व बालकांची आरोग्यवृध्दी दक्षता घेण्यात येत असल्याचे सांगितले़ डॉ़ नीना बोराडे व वैद्यकीय अधिव्याख्याता डॉ़ डावळ साळवे यांनी सुरक्षीत मातृत्व याविषयी मार्गदर्शन केले़ प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ शिंदे यांनी केले़ सुरक्षीत मातृत्वासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले़ सूत्रसंचालन जिल्हा साथरोग अधिकारी डॉ़ दुर्गादास रोडे यांनी केले़ प्रारंभी महात्मा गांधी पुतळ्यापासून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत जनजागृती रॅली काढण्यात आली़ (प्रतिनिधी)
‘आरोग्य सेवेत जिल्हा अग्रेसर’
By admin | Updated: July 11, 2014 01:02 IST