शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

आरोग्य विभागच आजारी

By admin | Updated: July 23, 2014 00:22 IST

सुनील चौरे, हदगाव तालुक्यातील २ लाख ६० हजार नागरिकांच्या आरोग्याचे ओझे केवळ १० डॉक्टरांच्या डोक्यावर असल्यामुळे आरोग्य विभाग आजारी झाला आहे.

सुनील चौरे, हदगावतालुक्यातील २ लाख ६० हजार नागरिकांच्या आरोग्याचे ओझे केवळ १० डॉक्टरांच्या डोक्यावर असल्यामुळे आरोग्य विभाग आजारी झाला आहे. या विभागालाच उपचाराची गरज असल्याचे चित्र आहे़ ३१ उपकेंद्रातील बाळंतकक्ष नावालाच असून गोरगरीबांना किरकोळ आजारांसाठी खाजगी डॉक्टराची मदत घ्यावी लागत आहे़तालुक्यात १४५ गावांतील २ लाख ६० हजार लोकांसाठी सहा आरोग्य केंद्र व एक उपजिल्हा रुग्णालय आहे़ या ६ प्राथमिक आरोग्य केंद्रावर २ लाख २१ हजार ग्रामस्थांना आरोग्य सेवा देण्यासाठी ४ डॉक्टर आहेत़ तामसा येथील डॉक्टर निवृत्त झाले असून बरडशेवाळा येथील डॉक्टरचे पद रिक्त आहे़ हदगाव शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ४० हजार लोकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी ६ डॉक्टर असून रेग्यूलर ५ डॉक्टर आहेत़ त्यापैकी दोन डॉक्टरांची बदली झाली आहे़या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३१ उपकेंद्र आहेत़ या उपकेंद्रावर निदान दोन कर्मचारी नियुक्त असणे आवश्यक आहे़ यामध्ये पुरूष कर्मचाऱ्यांची १९ पदे भरलेली आहेत़ तर १२ पदे रिक्त आहेत़ स्त्री कर्मचाऱ्यांची कंत्राटी ३१ पदे भरलेली आहेत़ एकूण आरोग्य कर्मचारी १४५ गावांसाठी ६२ आहेत़ प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर एक एमबीबीएस व एक बीएएमएस अशी दोन डॉक्टरांची पदे असतात़ परंतु बरडशेवाळा, आष्टी, तामसा या ठिकाणी ही पदे रिक्त आहेत़बरडशेवाळा, निमगाव, कोहळी, तामसा, आष्टी, वायफना येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत़ ही केंदे्र व्यवस्थित चालू राहिली तरी ग्रामस्थांना चांगली सेवा मिळू शकते़ परंतु येथे निम्मे पदे रिक्त आहेत़ असलेले डॉक्टर, कर्मचारी स्थानिक केंद्रात राहत नाहीत़ त्यामुळे ग्रामस्थांना नाईलाजास्तव खाजगी डॉक्टरकडे जावून आरोग्य बिघडून घ्यावे लागते़ आर्थिक भूर्दंड वेगळाच़ सहा प्राथमिक केंद्रांतर्गत ३१ उपकेंद्र नावालाच आहेत़ याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही़ पिंपरखेड, कवाना, अंबाळा, गोर्लेगाव, मनाठा, चाभरा, चिंचगव्हाण, निमगाव, आष्टी, लिंगापूर, हरडप, बनचिंचोली, लोहा, घोगरी, पाथरड, चिकाळा, शिरड, निवघा, तळणी, येळंब, भाटेगाव, उमरी, नेवरी, उंचेगाव (बु़), कोहळी इ़ केंद्रे आहेत़ परंतु सर्वत्र परिस्थिती सारखीच आहे़ उपकेंद्रावर बाळंतकक्ष २४ तास सुरू असायला पाहिजे़ ते केवळ ३ ते ४ तास आठवड्यातून ३ ते ४ दिवस सुरू असते़ अडगळीचे केंद्र कायमच बंद असतात़ एवढ्यावरही काम व्यवस्थित व्हावीत ही रुग्णाची अपेक्षा, तीही अपूर्णच़ कारण स्थानिक एकही कर्मचारी राहत नाही़ जिल्ह्यावरून ये-जा करतात़ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा किंवा वर्तमानपत्रात बातमी आली की दोन-चार दिवस हे डॉक्टर नियमित दिसतात़ पुन्हा चंद्राप्रमाणे गायब होतात़ याउलट खाजगी डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आह़े़ एखाद्या अवघड आजाराचा उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर घाबरेल, परंतु ही डॉक्टर मंडळी बेधडक महागडी औषधी देऊन रुग्णांचे बेहाल करतात़ नैसर्गिक आपत्ती, पावसाचा बेजबाबदारपणा या संकटातून तगावलेल्या ग्रामस्थांना या आरोग्य विभागाचाही दणका बसत आहे़बाळंतकक्षाची सुविधा उपलब्ध नाही मृत्यूदर घटला हे खरे असले तरी ग्रामीण भागात नवशिशु जन्मताच मृत पावण्याचे प्रमाण गंभीर आहे़ बाळंतकक्षाची व्यवस्था नसल्याने उपचाराअभावी महिन्याकाठी १-२ बालमृत्यू होतच असतो़ त्याची दप्तरी नोंदही नसते़ हे सर्व चुपचाप सुरू असते़ अनेक ठिकाणी पती-पत्नी, वडील-मुलगा किंवा नातेवाईक डॉक्टर आहेत़ त्यापैकी एकच दवाखान्यात उपस्थित असतो़ दुसरा फक्त पगार घेतो़ हदगाव शहरात शालेय तपासणीसाठी ३ डॉक्टर, आयुष डॉक्टर ३ यामध्ये आयुर्वेदिक, युनानी, अ‍ॅलोपॅथीक तर नियमित डॉक्टरांची संख्या ५ आहे़ यामध्ये दोन स्पेशालिस्टची बदली होवून त्याऐवजी दोन एमबीबीएस डॉक्टर देण्यात आले़ डॉक्टरांची संख्या वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमीच होत आहे़ कर्मचाऱ्यांमध्ये कुशल कर्मचाऱ्यांऐवजी लागेबांधे असलेल्यांची संख्या जास्त असल्यामुळे वरिष्ठांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागते़